• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tukaram Mudhe : तुकाराम मुंढेंच्या लग्नासाठी होत्या तीन अटी, तिसरी अट तर खूपच अवघड..

August 16, 2026 by admin Leave a Comment


तुकाराम मुंढे यांनी (FDA) अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यापासून राज्यात कामाचा धडकाच लावला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यभरात छापेमारी सुरू आहे. भेसळखोरांना चांगलाच चाप लागला असून, तुकाराम मुंढे यांच्या कामाचं संपूर्ण राज्यात कौतुक होत आहे. अधिकारी असावा तर असा असं प्रत्येक जण म्हणताना दिसत आहे. दरम्यान सध्या राज्यभरात त्यांची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या लग्नासंबंधित एक किस्सा आता समोर आला आहे. त्यांचे बंधू अशोक मुंढे यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखती तुकाराम मुंढे यांच्याशी संबंधित हा किस्सा सांगितला आहे.  तुकाराम मुंढे यांच्या आपल्या होणाऱ्या पत्नीकडून तीन अपेक्षा होत्या, असं अशोक मुंढे यांनी म्हटलं आहे.

काय होत्या तीन अटी?

या मुलाखतीमध्ये बोलताना तुकाराम मुंढे यांचे बंधू अशोक मुंढे म्हणाले की, लग्नामध्ये आमच्या दोघांचीही क्लियरॅलिटी होते, 100 टक्के सर्व गोष्टी स्पष्ट होत्या. मुलगी कशी असावी? तिचं बॅगग्राऊंड कसं असावं? कशात कॉप्रोमाईज करायचं आणि कुठे कॉप्रोमाईज करायचं नाही. हे तुकाराम मुंढे आणि माझं ठरलेलं होतं.  आता त्याचा एक किस्सा सांगतो, सुरुवातीला तर मीच मुलगी पाहायला जायचो. मला ठीक वाटलं तर मग गोष्ट तुकाराम मुंढे यांच्यापर्यंत पोहचायची.

इथे मी त्याच्यासाठी एक मुलगी पाहिली, ती दिसायला फार सुंदर होती. आम्ही जेवढ्या मुली पाहिल्या, त्यामध्ये ही दिसायला फार सुंदर होती. मुलीकडचे फार काही श्रीमंत नव्हते पण गरीबपण नव्हते. त्यांचा व्यवसाय होता, मुलगी पुण्यात वाढलेली होती. आता आम्हाला त्या कल्चरला जुळणारी पण मुलगी पाहिजे ना.

आमची पहिली अट होती, तिला इंग्लीश बोलता आलं पाहिजे. तेव्हा मला अनेकजण म्हणायचे की काय आवश्यकता आहे, या गोष्टीची. परंतु तोपर्यंत मी नोकरीत एक बारा तेरा वर्ष काढली होती, त्यामुळे त्याची काय गरज आहे, याची मला कल्पना होती. त्यामुळे तिला इंग्लीश बोलता येते का नाही हे आम्ही पहायचो? दुसरी अट ही होती की मुलीच्या अपेक्षा काय आहेत? आम्ही क्लिअर सांगायचो, जरी तो आयएस, असेल, तरी त्याचा पगार एवढा-एवढा आहे. त्या पगारामध्येच भागावं लागेल. तसेच तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तर तुम्हाला कार मिळणार नाही, तुम्हाला बसनेच प्रवास करावा लागेल. तेव्हा ते म्हणाले की बाकी सर्व गोष्टी ठीक आहे, पगार कमी आहे, ते पण ठीक आहे. पण बाकीच्या सुविधा तर असतातच ना? तेव्हा माझ्या लक्षात आलं मी त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि तिथून निघून आलो, असा किस्सा अशोक मुंढे यांनी  सांगितला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in