
सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना भारतीय संस्कृतीमध्ये प्रचंड महत्त्व दिले जाते. सणासुदीला किंवा आनंदाच्या क्षणी सोन्याचे दागिने परिधान करणे, तसेच चांदीच्या वस्तूंमध्ये देवाला नैव्यद्य दाखवण्याची जुनी परंपरा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदी खरेदी करणे सर्वसमान्यांना कठीण झाले आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा आणि 1 किलो चांदीचा काय आहे भाव? जाणून घ्या…
आजचा दिवस हा सर्वसमान्यांसाठी चांगला आहे. कारण जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे.
सराफ बाजारात सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर एक किलो चांदीच्या दरात जवळपास 12 हजार रुपयांची घसरण झाली आहे. हे घसरण मोठी मानली जात आहेत.
घसरलेल्या भावामुळे आज 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1 लाख 48 हजार 835 मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी जीएसटीसह 2 लाख 36 हजार 900 रुपये द्यावे लागणार आहेत.
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)




Leave a Reply