• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

TG Mohandas : ‘अशा महिलांना सामूहिक बलात्कार आवडतो’ संघ समर्थक मोहनदास यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर RSS ने सोडलं मौन

July 28, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेले टीजी मोहनदास यांनी अलीकडेच दिल्लीत झालेल्या प्रदर्शनावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “माझ्या हातात अधिकार असता तर दिल्लीत आंदोलन करणाऱ्या युवकांवर मी गोळ्या झाडल्या असत्या. ते मेल्यानंतर त्यांना रुग्णालयात पोहोचवलं असतं” इतकचं नाही त्यांनी महिलांबद्दल सुद्धा आक्षेपार्ह शब्द वापरले. “आंदोलनाला येणाऱ्या महिलांना सामूहिक बलात्काराने सुद्धा फरक पडत नाही. कारण त्यांना बलात्कार आवडतो” अशी धक्कादायक वक्तव्य टीजी मोहनदास यांनी केली होती. टीजी मोहनदास हे केरळचे असून ते आरएसएस समर्थक मानले जातात. आता आरएसएसने या बद्दल भूमिका घेतली आहे. त्यांनी टीजी मोहनदास यांच्या वक्तव्यांचा निषेध केला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना संघाने म्हटलयं की, ‘हे मोहनदास यांचे व्यक्तिगत विचार आहेत, संघाचे असे विचार नाहीत. संघ अशा विचारांचं समर्थन करत नाही’ आरएसएसच्या दक्षिण केरळ प्रांताचे सह-कार्यवाह केबी श्रीकुमार म्हणाले की, “मोहनदास यांनी व्यक्त केलेल्या विचारांशी संघाचा काहीही संबंध नाही. आम्ही अशा विचारांचं समर्थन करत नाही, ना आम्ही सहमत आहोत”

द्वेषपूर्ण भाषेच्या चौकशीचे आदेश

“अलीकडे झालेल्या विरोध प्रदर्शनावर मोहनदास यांनी केलेली टिप्पणी त्यांचे खासगी विचार आहेत. ते आरएसएसमध्ये कुठेही पदावर नाहीत. आरएसएस त्यांच्या विचारांशी सहमत नाही” असं केबी श्रीकुमार यांनी स्पष्ट केलं. ‘आम्ही अशा वक्तव्यांचा कठोर शब्दात निषेध करतो’ असं श्रीकुमार म्हणाले. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की, “मोहनदास यांच्याकडे आरएसएसमध्ये कुठलीही जबाबदारी नाही”

राज्यात मोठा वाद निर्माण झाला

केरळ सरकारने मोहनदास यांच्या द्वेषपूर्ण भाषेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तुम्ही त्यांच्या वक्तव्याची चौकशी करुन रिपोर्ट सोपवा असं केरळ सरकारने म्हटलं आहे. याआधी सुद्धा विरोध प्रदर्शनावरुन मोहनदास यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक राजकीय पक्ष, संघटनांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मोहनदास यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. मोहनदास यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात ते म्हणालेले की, “माझ्याकडे अधिकार असता तर चार-पाच किलोमीटरच्या कक्षेत मी कर्फ्यू लावला असता”



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Friday Remedies: शुक्रवारी करा ‘हे’ 5 सोपे उपाय; माता लक्ष्मीच्या कृपेने दूर होईल पैशांची चणचण!
  • मोठी बातमी ! आता रूपाली चाकणकरांचं पुण्यात बार-रेस्टॉरंट, उद्घाटनाला बडे नेते, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
  • ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्रीने कल्याणमध्ये सुरू केलं हॉटेल; स्वत: बनवते रुचकर जेवण
  • Chandra Grahan 2026 : वर्षातलं शेवटचं चंद्र ग्रहण कधी ? ग्रहणाच्या दिवशी ही काम टाळाच,नाहीतर..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in