• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

TET Exam Paper Leak: एका TET पेपरची किंमत 15000000, कुणी फोडला पेपर? खळबळजनक माहिती समोर

June 27, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपरफुटीचे धागेदोरे अद्याप पूर्णपणे उलगडले नसतानाच आता टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेच्या फक्त २४ तास आधी पेपर लीक झाल्याने उमेदवारांमध्ये मोठा संताप आणि निराशा पसरली आहे. भिवंडी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, तीन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. आता या आरोपींनी पेपर किती कोटी रुपयांना विकला गेला याबाबत खुलासा केला आहे.

भिवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 लोक TET चा पेपर विकायला आल्याचे आढळले. त्यांच्याकडे 4 सेट पेपरच आढळले. शिक्षण विभागाने ते पेपर तपासले आणी ते पेपर उद्या होणाऱ्या परिक्षेच्या समान आढळले. यात विशेष तपास पक्षकाची नेमणुक केली आहे. पुढील तपासासाठी पथक रवाना झाले आहे. 1 डिसीपी (पवन बनसोड), 2 एसीपी, 9 पीआए पिएसआय आणि 20 कर्मचारी यांचे मिळुन पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक अधिक तपासासाठी विविध राज्यात रवाना झाले आहे.

एका टीईटी पेपेरची किंत 15000000

पुढे पोलीस म्हणाले की, या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार आहे. त्याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. 2 बिहारी आणी 1 हरियाणाचा आहे. हे दिल्लीतून आल्याची माहिती समोर आली आहे. पेपर कोणाला विकला याची चौकशी सुरु आहे. पेपर विकताना आरोपींनी दीड करोड रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर ते बाकी लोकांना विकणार होते. सर्व शक्यतांना अनुसरुन तपास सुरू आहे. पेपर त्यांनी दिल्लीवरुन आणले असल्याची माहिती मिळाली. आरोपींनी पेपर कोणाला विकले याचे चौकशी सुरु आहे. सकाळी 11 वाजता ट्रॅप लावुन कोणगावमधुन त्यांना ताब्यात घेतले. आरोपींच्या पोलीस कोठडीची आम्ही मागणी केली आहे. एका आरोपीने केद्रिय विद्यायलाची परीक्षा दिली होती आणी तो त्यात नापास झाल्याची माहिती मिळाली आहे.

एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला संताप

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना संतापजनक आहे. भविष्यातील पिढी घडवणाऱ्या शिक्षकांच्या निवडीसाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत अशा प्रकारचे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि अत्यंत कठोर चौकशी केली जाईल. दोषी कोणही असला तरी त्याला सोडले जाणार नाही. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. मग तो भ्रष्ट अधिकारी असो वा कोणतीही संघटित टोळी, त्यांच्यावर कायद्याचा पूर्ण बडगा उगारला जाईल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : महिला जातील यशाच्या शिखरावर, आचार्य चाणक्य यांच्या 4 संदेशाकडे कधीच करू नका दुर्लक्ष!
  • फक्त 3.50 लाखांपासून किंमत! 26 किमी मायलेज देणाऱ्या देशातील ‘8’ सर्वात स्वस्त गाड्या; बघा फीचर्स
  • 9000mAh क्षमतेची मोठी बॅटरी असलेला हा वनप्लस स्मार्टफोन मोठ्या सवलतीत उपलब्ध, जाणून घ्या ऑफर
  • Kriti Sanon : कृती सेनला राहुल गांधींचा पाठिंबा, ट्रोल करणाऱ्यांना थेट सुनावलं, म्हणाले महिलांनी काय परिधान करावं…
  • धक्कादायक! ‘या’ तीन औषधांमुळे निर्माण होऊ शकतो कॅन्सरचा धोका, जागतिक आरोग्य संघटनेने दिला गंभीर इशारा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in