
सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. त्यांनी सुनावणीत निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारे मुद्दे मांडले. ‘आम्ही सर्व समाधानी आहोत, आम्हाला न्याय मिळेल’ असं संजय राऊत सुनावणी संपल्यानंतर बोलले.
सुप्रीम कोर्टात आज 3 मुख्य मुद्द्यांवर ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला
1. सिब्बल यांनी शिंदेंच्या मुख्य नेता या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उभं केलं
2. शिवसेना पक्षाच्या 1999च्या घटनेत मुख्य नेता असा उल्लेखच नाही
3. पक्षाच्या घटनेत मुख्य नेता नव्हे तर पक्षप्रमुख पदाचा उल्लेख आहे
4. शिंदे स्वत:ला मुख्य नेता कोणत्या आधारावर बोलतात? असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला
5. शिंदेंच्या निवडीवर कपिल सिब्बल यांनी 2018 च्या घटनाबदलावरुनही प्रश्नचिन्ह उभं केलं
6. 2018 चा पक्षातला घटनाबदल संवैधानिक नाही असं शिंदे गटाचं म्हणणं आहे, मग त्याच घटनाबदलानुसार शिंदेंची निवड संवैधानिक कशी? असा मुद्दा कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात उपस्थित केला
7. पक्षात आले, लाभ घेतला आणि नंतर पक्षच लोकशाहीविरोधी आहे असं म्हटलं गेलं
कपिल सिब्बल यांचा दुसरा मुख्य युक्तिवाद आयोगानं पक्ष आणि चिन्ह शिंदेंना देण्यावर होता
8 निवडणूक आयोग हा लवादासारखं काम करतो
9 पक्षातील फुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही
10 पक्षाची घटना संवैधानिक आहे की असंवैधानिक हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही
11 जी फूट पडली ती विधीमंडळ पक्षात पडली, राजकीय पक्षात फूट पडली नाही
12 विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा आहे
13 मात्र शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय हा फक्त विधीमंडळ पक्षाच्या बहुमतावर झाला
14 शिवसेनेत फूट पडली असा निवडणूक आयोगाचा निष्कर्ष आहे
15 परिच्छेद 15 नुसार निवडणूक आयोगाला पक्ष आणि चिन्हाचा निर्णय देण्याचा अधिकार नाही
16 शिंदे गटाच्या 54 पैकी 35 आमदारांनी निर्णय घेऊन व्हीप बदलला
17 पण 1 तृतीयांश सदस्यांच्या गट स्थापनेसाठी मूळ पक्षाची मान्यता हवी
18 अन्यथा त्या गटाला कुठल्यातरी पक्षात विलीन व्हावं लागतं
19 पण विधीमंडळातील बहुमतावरच एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिलं गेलं
कपिल सिब्बल यांचा तिसरा मुख्य युक्तिवाद पक्षाच्या घटनेवर होता
20 पक्षातल्या नेमणुका कशा असाव्या हे पक्ष ठरवतो
21 नेमणुकांबद्दल प्रत्येक पक्षाची रचना वेगळी असते
22 वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळी रचना आहे
23 पक्षातल्या नेमणुकांबद्दल आयोग ठरवू शकत नाही
असे मुद्दे कपिल सिब्बल यांनी मांडले
यानंतर आजची सुनावणी संपली
मंगळवारी दुपारी 2 वाजता यावर पुन्हा सुनावणी होणार आहे
Leave a Reply