• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sunny Deol: 56 कोटींचं कर्ज, बँकेकडून घराच्या लिलावाची नोटीस; सनी देओलने सांगितला कठीण काळ

August 18, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता सनी देओलचा ‘बंटवारा 1947’ हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत सनी देओल त्याच्या करिअरमधील कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. काही चित्रपटांच्या निर्मितीमुळे सनी देओलवर तब्बल 56 कोटी रुपयांचं कर्ज होतं. इतकंच नव्हे तर बँकेनं त्याच्या संपत्तीच्या लिलावासाठी नोटीससुद्धा जारी केली होती. हे कर्ज त्याने कसं फेडलं होतं आणि त्यावेळी त्याची मानसिक स्थिती कशी होती, याविषयीही सनी देओलने सांगितलं आहे.

बँकेकडून लिलावाची नोटीस

2023 मध्ये ‘गदर 2’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लगेचच एका बँकेनं सनी देओलच्या जुहू इथल्या व्हिलासाठी ई-लिलावाची नोटीस जारी केली होती. ही नोटीस 55.99 कोटी रुपयांच्या व्याजाच्या थकबाकीमुळे जारी करण्यात आली होती. नंतर जेव्हा सनीने थकबाकीची रक्कम भरण्यास सहमती दर्शवली, तेव्हा बँकेनं ती नोटीस मागे घेतली. शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सनी म्हणाला, “मी फक्त पैशांसाठी अनेक गोष्टी करू शकत नाही. पण खरं सांगायचं झालं तर, त्यावेळी कर्जात बुडालो असतानाही मी आनंदी होतो. मी माझं आयुष्य मनाप्रमाणे जगत होतो.”

“मला ज्या रकमेची परतफेड करायची होती, ती रक्कम पूर्णपणे माझी स्वत:ची होती. मी कोणाकडूनही कर्ज घेतलं नव्हतं किंवा माझं कोणालाही काही देणं नव्हतं. मला फक्त माझी प्रॉपर्टी विकून पैसे परत करायचे होते”, असं त्याने पुढे स्पष्ट केलं.

सनी देओलवर कर्ज कशामुळे?

सनी देओलने 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘घायल रिटर्न्स’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं आणि त्यात त्याने अभिनयही केला होता. त्यापूर्वी 1999 मध्ये ‘दिल्लगी’ या चित्रपटाचंही दिग्दर्शन त्याने केलं होतं. या चित्रपटात त्याचा धाकटा भाऊ बॉबी देओलनेही काम केलं होतं. नंतर 2019 मध्ये ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून त्याचा मुलगी करण देओलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटाची निर्मिती सनीने केली होती. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. यामुळेच सनी देओलसमोर कर्जाचं डोंगर उभं राहिलं होतं.

2000 दशकाच्या सुरुवातीला योग्य विषय आणि निर्माते शोधण्यात खूप अडचण आल्याचाही दावा सनीने या मुलाखतीत केला. “गदरसोबतच मी ‘इंडियन’ हा चित्रपटही दिला होता, जो लगान आणि त्या काळातील इतर सर्व चित्रपटांपेक्षा हिट ठरला होता. या चित्रपटाने लगानपेक्षा दोन ते तीन पट जास्त कमाई केली होती. परंतु या यशानंतर कॉर्पोरेट स्टुडिओ आणि निर्मितीच्या पद्धतीत झालेल्या बदलामुळे मी दिशा बदलली. मला योग्य विषय आणि निर्माते का मिळत नव्हते, हे मला माहीत नाही”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in