• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sonakshi Sinha : शत्रुघ्न सिन्हा-जहीर इक्बालसमोरच भडकली सोनाक्षी सिन्हा, संतापून म्हणाली – आता बास…

July 1, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि तिचा पती जहीर इक्बाल नेहमी चर्चेत असतात. कधी बाहेर पडल्यावर पापाराझी दिसले किंवा इव्हेंटमध्ये ते एकत्र असले की छान हसून पोझ देतात. त्या दोघांचीही जोडी लोकांना खूप आवडते. मात्र नुकतीच सोनाक्षी सिन्हा ही, तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि पती जहीर इक्बाल हे समोर असतानाच भडकलेली दिसली. ती खूप संतापली होती. आता बास करा असं म्हणतानाही ती रागावलेली होती. तिच्या रागाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे.

खरंतर सोनाक्षी ही नुकतीच एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट झाली. मात्र तेथीली फोटोग्राफर्समुळे ती चांगलीच हैराण झालेली होती. सोनाक्षी सिन्हा हा तिचा पती जहीर इक्बाल आणि वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत डिनरसाठी बाहेर गेली होती. रेस्टॉरंटमधून बाहेर पडताच त्यांना पापाराझींनी (छायाचित्रकारांच्या) मोठी गर्दी करत वेढलं. पण त्यामुळे सोनाक्षी खूप वैतागलेली होती.

नक्की काय झालं, सोनाक्षी का भडकली ?

काळ्या रंगाचा ड्रेस घालून बाहेर पडलेली सोनाक्षी ही जेवणानंतर वडिलांना निरोप देत होती. रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना सोनाक्षी हिने आधी हात जोडून फोटोग्राफर्सना अभिवादन केलं. मात्र त्यानंतर फोटोग्राफर्स हे सतत व्हिडीओ घेत होते आणि फोटोही काढत होते, तेव्हा अखेर सोनाक्षी हिचा संयम संपला. वडिलांना बाय करून, कारमध्ये बसल्यावर सोनाक्षी मागे वळली आणि तिने पापाराझींना सांगितले, “आता पुरे झालं.” त्यानंतर तिने हात जोडले आणि म्हणाली, “मित्रांनो, एवढंच. थँक्यू, गुड नाईट”, पण असं म्हणतानाही तिच्या चेहऱ्यावर वैतागलेले बाव स्पष्टपणे दिसत होतेच. सोनाक्षीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जहीरही म्हणाला आता पुरे

सोनाक्षीचा रागरंग पाहून तिथे उभा असलेला तिचा पती, जहीर इक्बाल हाही पुढे आला आणि त्याने पापाराझींना व्हिडीओ काढणं, फोटो काढणं थांबवण्यास सांगितलं. त्यानंतर सोनाक्षी पुन्हा थोड्या अधिक ठाम स्वरात म्हणाली: “मित्रांनो… बास, धन्यवाद.” मग सोनाक्षी – जहीरसह संपूर्ण कुटुंब गाडीत बसलं आणि निघून गेलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mr.Dadhiwala (@mrdadhiwalaofficial)

सोनाक्षीची कारकीर्द

सोनाक्षी सिन्हाने 2010 साली सलमान खानच्या ‘दबंग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘रावडी राठोड’, ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘हॉलिडे’ यांसारख्या अनेक प्रमुख चित्रपटांमध्ये काम केले. अलीकडच्या काळात, ‘दहाड’ आणि ‘हीरामंडी’ या ओटीटी (OTT) मालिकांमधील तिच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं

 





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाजपला धक्का, स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता नव्या पक्षात एन्ट्री करणार
  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in