• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

SIR: राज्यातील ‘एसआयआर’ला 8 दिवसांची मुदतवाढ, अनेक पक्षांच्या मागणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

July 17, 2026 by admin Leave a Comment


SIR Extension in Maharashtra : राज्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेला 8 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीसह अनेक राज्यात SIR प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी होती. महाराष्ट्रातही SIR प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर राज्यात SIR प्रक्रियेला 8 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. पाऊस आणि इतर बाबींमुळे SIR प्रक्रियेला वेळ वाढवून द्यावा अशी अनेक पक्षांनी मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने 8 दिवसाचा कालावधी वाढवून दिला आहे.

दिल्लीतील वेळापत्रकात मोठा बदल

दिल्लीतही एसआयआरला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार एसआयआर प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. आता सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार, 19 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल, यापूर्वी ही तारीख 7 ऑक्टोबर अशी होती. दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 14 जुलै रोजी अतिरिक्त वेळ देण्याची विनंती केली होती. त्यानंतर संपूर्ण एसआयआर प्रक्रियेतील विविध टप्प्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.

दिल्लीत सुधारीत वेळापत्रकानुसार, बुथ लेव्हल अधिकारी(BLO) 8 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन मतदार याद्यांची पडताळणी करतील. यापूर्वी ही प्रक्रिया 23 जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार होती. या प्रक्रियेसाठी दहा दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळाला आहे. मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख बदलली आहे. 17 ऑगस्ट रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध होईल. यापूर्वी ती 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार होती.

महाराष्ट्रातूनही मुदतवाढीची मागणी

राज्यातील एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. ही प्रक्रिया अधिक क्लिष्ट असल्याने त्यासाठी एक महिन्याची मुदत अपुरी असल्याचे विधान परिषद सदस्य सतेज पाटील यांनी म्हटले होते. तर संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात भारतीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून सहा महिन्यांपर्यंत मुदत वाढ देण्याची विनंती करण्यात येईल असे सांगितले.

शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त भार

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, शिक्षकांना नियमित शैक्षणिक कामकाजासोबतच निवडणुकीची जबाबदारीही पार पाडावी लागत आहे. शाळेचे अध्यापन आणि मतदार पुनर्रचना अशी दोन्ही कामे करताना त्यांची तारेवरची कसरत होत आहे. शिक्षकांऐवजी इतर विभागातील कर्मचारी आणि स्वतंत्र मनुष्यबळ कामाला लावण्याची मागणीही करण्यात येत आहे. काही ठिकाणी शिक्षकांनी प्रशिक्षणालाही दांडी मारली. तर  काही संघटना आणि राजकीय नेत्यांनी शिक्षकांना एसआयआरच्या कामाला जुंपू नये अशी मागणी रेटली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IAS दिव्या मित्तल यांचा राजीनामा, भावूक पोस्ट करत म्हणाल्या की, मी मुर्ख होते विचार करायचे की…
  • जाळ अन् धूर सोबतच; चीन, पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून मित्र भारतासाठी रशियाचा सर्वात मोठा निर्णय
  • दुबईत क्रेन चालवणाऱ्याला लाखोंनी पगार, भारतातल्या इंजिनिअरपेक्षाही…आकडा वाचून चकित व्हाल!
  • बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, मी फक्त बघत बसलो… महायुतीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली खदखद
  • केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in