• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shivsena Supreme Court Hearing : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा’, शिवसेना कोणाची? सर्वोच्च न्यायालयात आज ठाकरे गटाचा अंतिम युक्तीवाद

August 20, 2026 by admin Leave a Comment


सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भात नियमित सुनावणी सुरु आहे. आज उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांकडून अंतिम युक्तीवाद केला जाईल. शिवसेना पक्ष-निवडणूक चिन्हासंदर्भात या खटल्यात ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. काल कपिल सिब्बल यांनी अंतिम युक्तीवाद केला. आज ठाकरे गटाचे दुसरे वकिल देवदत्त कामत पुन्हा युक्तीवाद करतील. जवळपास अर्धातास ते युक्तीवाद करतील. राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा हा ठाकरे गटाच्या दोन्ही वकिलांचा मुख्य दावा आहे. निवडणूक आयोग असो किंवा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांनी विधिमंडळ पक्षातील संख्याबळाच्या आधारावर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. त्यांच्याकडे शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह सोपवलं. फक्त विधिमंडळ पक्ष ध्यानात घेऊन असा निर्णय घेणं चुकीचं आहे असं कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांचा युक्तीवाद आहे.

कालच्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी एक महत्वाची मागणी केली. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या किंवा गोठवा अशी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठी मागणी करण्यात आली. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे उद्धव ठाकरेंच आहे. त्याचा फायदा एकनाथ शिंदे यांनी घेतला असा दावा ठाकरेंच्या वकिलांनी केला. “प्रकरण कोर्टात असताना निवडणूक आयोगाने थेट निर्णय दिला. विधिमंडळ पक्षाने एकनाथ शिंदे यांना नेता निवडलं. निवडीच पत्र राज्यपालांना दिलं. शिवसेना हा ठाकरेंचा पक्ष आहे” असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. “पक्ष आणि चिन्ह यांचा फायदा शिंदेंनी घेतला. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या आणि आम्हाला मिळत नसेल तर ते गोठवा तसचं शिंदे मुख्यमंत्री झाले पण कोणत्या पक्षातून” असा सवाल वकिल कपिल सिब्बल यांनी केला. सध्या ही सुनावणी आमदार अपात्रतेभोवती फिरत आहे.

सर्वोच्च न्यायालय कोणाची बाजू मान्य करणार?

आज उद्धव ठाकरे गटाचा युक्तीवाद संपेल. त्यानंतर एकनाथ शिंदेंचे वकिल सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडतील. ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तीवादातून निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. त्यांना कोंडीत पकडणारे मुद्दे सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केले.

“विधिमंडळ पक्ष तात्पुरस्त्या स्वरुपात असतो.आमदार जेवढ्या काळासाठी निवडून आले, तेवढ्या काळासाठी हा पक्ष असतो. 10 व्या सूचीनूसार विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नाही. आमदार असोत किंवा नसतो पक्ष हा आयोगाकडे नोंदणीकृत असतो. विधिमंडळ पक्षाला महत्व दिलं तर राजकीय पक्षाला महत्व काय?” असे काही विचार करायला भाग पाडणारे मुद्दे उपस्थित केलेत. आता शिंदेंचे वकिल यावर काय युक्तीवाद करतात, सर्वोच्च न्यायालय कोणाची बाजू मान्य करणार? हे लवकरच समजेल.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in