
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची? या खटल्याची सुनावणी सुरु झाली आहे. आज ठाकरे गट अंतिम युक्तीवाद करणार आहे. कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत हे ठाकरे गटाचे दोन वकिल आहेत. कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद काल संपला. आज देवदत्त कामत जवळपास अर्धातास युक्तीवाद करतील. त्यानंतर पुढच्या आठवड्यात एकनाथ शिंदे शिवसेनेचे वकिल न्यायालयात आपली बाजू मांडतील. उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद हा विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही, यावर केंद्रीत आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच निकाल ऐतिहासिक असेल. सगळ्या देशाचं या निकालाच्या खटल्याकडे लक्ष लागलं आहे. 2023 साली निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवलं. त्यांच्या गटाला अधिकृत शिवसेना ठरवलं.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलय. कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तीवादात निवडणूक आयोगाने कसे चुकीचे निर्णय घेतले? हे सांगताना निवडणूक आयोगाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मागच्या दोन वर्षांपासून सतत या खटल्याची सुनावणी पुढे जात होती. पण आता यावर नियमित सुनावणी सुरु झाली आहे.
Leave a Reply