• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shatrughna Sinha : तिला काय सुनवायचं हे लिहून दिलं जातं, लेकीला ट्रोल करणाऱ्यांचा शत्रुघ्न सिन्हांनी घेतला समाचार

August 18, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडची ‘दबंग’ अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) तिच्या एका भूमिकेमुळे नुकतीच चर्चेत आली होती. दिल्लीतील जंतरमंतर येथे सीजेपीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला तिने उघडपणे पाठिंबा दर्शवला होता. एवढंच नव्हे तर या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासोबत झालेल्या कारवाईवरही तिने नाराजी व्यक्त केली. तिच्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर सोनाक्षीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं, तिच्यावर बरीच टीकाही झाली. मात्र आता या ट्रोलिंगवर तिचे वडील आणि अभिनेते-राजकारणी शत्रुघ्न सिन्हा (Shatrughna Sinha) यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. मुलीच्या बचावासाठी पुढे येताना त्यांनी थेट भाजप IT सेलवर गंभीर आरोप केले आहेत.

सोनाक्षीला टार्गेट करणारे पेड ट्रोल्स

एबीपी न्यूजशी संवाद साधताना शत्रुघ्न सिन्हा यांनी, सोनाक्षीला ट्रोल करणाऱ्यांवर निशआणा साधला. सोशल मीडियावर सुरु असलेलं हे ट्रोलिंग स्वाभाविक नसून त्यामागे नियोजन असल्याचा दावा त्यांनी केला. एवढंच नव्हे तर लेकीवर टीका करणारे हे पेड ट्रोल्स ( पैसे घेऊन ट्रोलिंग करणारे) असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. “जे लोक तिला ट्रोल करतात आणि तिच्याविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, ते पेड ट्रोल्स आहेत. आमच्या मित्रांची, भाजप IT सेलचे लोक आणि त्यांच्या धोरणांना पाठिंबा देणारे लोक हे( ट्रोलिंग) करतात, ” असा गंभीर आरोप शत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळी केला. एवढंच नव्हे, तर या ट्रोल्सना नेमकं काय बोलायचं, हेही लिहून दिलं जातं, असाही दावा त्यांनी केला. “नक्की काय म्हणायचंय हेही त्यांना स्वतःला काय माहीत नसतं. त्यांना लिहून दिलं जातं,” असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

‘बहुत जान है उसमें…’

यावेळी त्यांनी लेक सोनाक्षीचीही स्तुती केली. सोनाक्षी ट्रोल्सकडे दुर्लक्ष करते, तिच्या या भूमिकेचं शत्रुघ्न सिन्हांनी कौतुक केलं. माझी मुलगी सोशल मीडिया ट्रोलिंगला घाबरत नसल्याचं सांगताना त्यांनी तिच्या खंबीर स्वभावाचं कौतुक केलं. “खूप जिद्द आहे तिच्यात,” असं म्हणत त्यांनी सोनाक्षीच्या धाडसी भूमिकेला पाठिंबा दिला.

राजकारणात येणार का सोनाक्षी ?

सोनाक्षीच्या मांडलेल्या राजकीय भूमिकांमुळे भविष्यात ती राजकारणात प्रवेश करणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. याबाबत शत्रुघ्न सिन्हा यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यावर त्यांनी थेट उत्तर देणं, स्पष्ट भाष्य करणं टाळलं. याबबात मी काही बोलू शकत नाही, असं ते म्हणाले.

सीजेपीच्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवण्यात आल्यानंतर सोनाक्षीने सोशल मीडियावरून निषेध केला होता. तसंच तिने वांगचुक आणि इतर विद्यार्थी आंदोलकांच्या समर्थनार्थ व्हिडिओही शेअर केला होता.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in