• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shani Nakshatra Parivartan 2026 : 20 ऑगस्टला शनीचे नक्षत्र परिवर्तन, ‘या’ 3 राशींचे नशीब पालटणार; 9 ऑक्टोबरपर्यंत मिळणार लाभ

August 17, 2026 by admin Leave a Comment


Shani Nakshatra Parivartan 2026 : 20 ऑगस्टला शनीचे नक्षत्र परिवर्तन, ‘या’ 3 राशींचे नशीब पालटणार; 9 ऑक्टोबरपर्यंत मिळणार लाभ

खरंतर ज्योतिषशास्त्रात शनीदेवांना कर्म, न्याय आणि शिस्तीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळेच शनीच्या राशी किंवा नक्षत्रातील बदलाकडे ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाने पाहिलं जातं. आता 20 ऑगस्ट 2026 रोजी शनीदेव रेवती नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, हा प्रवास 9 ऑक्टोबर 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. शनीच्या या नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळू शकतो. मात्र 3 राशींसाठी हा काळ, हा प्रवास विशेष लाभदायक ठरू शकतो. सिंह, मकर आणि मीन राशीच्या जातकांसाठी हा काळ खास ठरणार आहे. त्यांचं करिअर, आर्थिक स्थिती आणि रखडलेली कामे यामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात.

सिंह राशी

सिंह राशीच्या जातकांसाठी शनीचे रेवती नक्षत्रातील परिवर्तन शुभ ठरू शकतं. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून या राशीचे जातक मेहनत घेत असतील, तर आता त्यांना त्याचे सकारात्मक परिणाम दिसू शकतात. नोकरीच्या ठिकाणी त्यांची जबाबदारी वाढू शकते, तसेच प्रगतीची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांनाही आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाच्या बाबतीत परिस्थिती सुधारू शकते आणि या राशीच्या जातकांना एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

मकर राशी

शनीचं हे नक्षत्र परिवर्तन मकर राशीसाठी अनेक बाबतींत दिलासादायक ठरू शकतं. त्यांचीबऱ्याच काळापासून रखडलेली कामं आता पुन्हा मार्गी लागण्याची शक्यता आहे. या राशीच्या जातकांना नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते अथवा, त्यांच्या प्रमोशनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. आर्थिक बाबतीतही सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. तसेच त्यांच्या आयुष्यात नातेसंबंधांमध्येही सकारात्मक बदल जाणवण्याची शक्यता आहे.

मीन राशी

मीन राशीतच सध्या शनीचे गोचर सुरू असून आता शनी रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मीन राशीच्या जातकांसाठी हा बदल खूपच महत्त्वाचा मानला जात आहे. या दरम्यान करिअरमध्ये मोठ्या प्रगतीची संधि दार ठोठावू शकते. तसेच कामाच्या ठिकाणी त्यांची पकड मजबूत होण्याचीही शक्यता आहे, कामाची दखल घेतली जाईल, मेहनत दिसून येईल. त्यामुळे मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. मात्र या राशीच्या लोकांनी या काळात घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नये, त्याऐवजी संयम बाळगून, नीट विचार करूनच मग पुढे जावं. त्याचे परिणाम नक्कीच चांगले मिळतील.

9 ऑक्टोबरपर्यंत असेल प्रभाव

20 ऑगस्टपासून ते 9 ऑक्टोबरपर्यंत शनीदेव हे रेवती नक्षत्रात राहणार आहेत. त्यामुळे हा साधारण दीड महिन्याचा कालावधी संबंधित राशींसाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या ग्रहाच्या गोचराचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर समान होत नाही. जन्मकुंडलीतील ग्रहांची स्थिती, दशा आणि इतर ज्योतिषीय घटक यांचाही त्यावर प्रभाव असतो. त्यामुळे हे परिणाम हे सामान्य ज्योतिषीय अंदाज मानावेत.

(डिस्क्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे. ती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आलेली आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही, याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in