• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shakib Al Hasan : शेख हसीना यांच्या भाषणानंतर बांग्लादेशमध्ये मोठा राडा, क्रिकेटर शाकिब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला

August 6, 2026 by admin Leave a Comment

बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये वर्चुअली सहभागी होणं, बांग्लादेश क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराला चांगलचं महाग पडलं आहे. शेख हसीना यांच्या पत्रकार परिषदेनंतर काही तासांनी शाकिब अल हसन याच्या वडिलोपार्जित घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. बुधवारी रात्री ही घटना घडली. शाकिब अल हसन बांग्लादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अवामी लीग पक्षाचा माजी खासदार आहे. मागुरा शहरातील केशवमोर भागातील शाकिब अल हसनच्या वडिलोपार्जित घरावर हा हल्ला झाला. घरात तोड-फोडही करण्यात आली. काल दिल्लीच्या फॉरेन कॉरेस्पोंडेंट्स क्लबमध्ये शेख हसीना यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी शाकिब अल हसन वर्चुअली सहभागी झाला होता. पत्रकार परिषदेनंतर काहीवेळाने शाकिबच्या घरावर हल्ला झाला.

बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने शेख हसीना यांच्या या पत्रकार परिषदेवर नाराजी व्यक्त केली. पत्रकार परिषदेआधी BNP, इस्लामी जमात आणि NCP यांनी नॅशनल मीडियाला खुलेआम धमकी दिली होती. प्रेस कॉन्फ्रेंसच्या बातम्या छापल्या तर ते कोर्टात जातील व खटला दाखल करतील. अवामी लीगने या हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली आहे. “ही विचारपूर्वक केलेली कृती आहे. अवामी लीगच्या कार्यकर्त्यांविरुद्ध सुरु असलेल्या नरसंहार अभियानाचा एक पुरावा आहे” बुधवारी शेख हसीना सरकारच्या सत्तापालटाला दोन वर्ष पूर्ण झाली. ‘मी डिसेंबर महिन्यात बांग्लादेशमध्ये परत जाणार’ असं शेख हसीना यांनी या पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे.बांग्लादेशात परत लोकशाही आणण्यासाठी अटक किंवा मृत्यू दोघांचा सामना करण्यासाठी त्या तयार आहेत.

(बातमी अपडेट होत आहे)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रक्षाबंधनाला बहिणीला कोणते खास गिफ्ट? Coin, Jewellery वा Digital Gold? हा पर्याय एकदम स्मार्ट
  • उन्हाळा असो वा पावसाळा; कारमध्ये ‘या’ गोष्टी विसरूनही ठेवू नका, होऊ शकते मोठे नुकसान
  • Amitabh Bachchan : जया बच्चन यांचा ‘ओरडा’ टाळण्यासाठी अमिताभ बच्चन काय करतात? सांगितला मजेशीर किस्सा
  • म्युच्युअल फंडांची मोठी खेळी! ‘या’ सोलर स्टॉकमध्ये खरेदी केली 10 कोटी शेअर्स; हिस्सेदारी 350 टक्के वाढली
  • जळगाव हादरलं! भरधाव ट्रक कावड येत्रात घुसला, 8 वर्षीय चिमुकल्याला चिरडलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in