
सुप्रीम कोर्टात आज सुनावणी आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ही सुनावणी होणार आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तीवादाला सुरूवात होईल. दुपारी 2 वाजता ही सुनावणी कोर्टात सुरू झाली. कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तीवाद कोर्टात केला जात आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सिब्बल यांच्या युक्तीवादानंतर शिंदे गटाकडून युक्तीवाद केला जाईल. या सुनावणीकडे राज्याच्या नजरा आहेत. कपिल सिब्बल कोर्टात अपात्रतेच्या मुद्द्यावर बोलतील. यासोबतच यापूर्वीच्या सुनावणीत त्यांनी थेट निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. निवडणूक आयोगाने त्यांच्या कक्षाबाहेर जाऊन काम केल्याचे त्यांनी म्हटले. यासोबतच निवडणूक आयोगाकडून मिळालेली पोहोच पावतीही त्यांनी कोर्टात दाखवली.
Leave a Reply