• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Santosh Bangar : शिंदेंचे आमदार संतोष बांगर CEO ला थेट नडले, ‘नोकर आहात, तुम्ही नोकरांसारखे वागा’

August 15, 2026 by admin Leave a Comment


एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर नेहमीच त्यांची वक्तव्य आणि कृतीमुळे चर्चेत असतात. आता DPDC च्या बैठकीत आमदार संतोष बांगर आणि सीईओमध्य चांगलीच खडाजंगी झाली. आरोग्य विभागाच्या बदल्या वरून आमदार संतोष बांगर संतापले होते.” नोकर आहात, तुम्ही नोकरांसारखे वागा” अशा शब्दात संतोष बांगर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना झापलं. दरम्या डीपीडीसीची बैठक सुरू असताना शेतकऱ्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली. पालकमंत्री नरहरी झिरवळ, दोन खासदार तीन आमदार असताना शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी केली. 2022 साली एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांमध्ये संतोष बांगर होते. संतोष बांगर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. एक आक्रमक आमदार अशी त्यांची ओळख आहे.

संतोष बांगर हे स्पष्टपणे बोलण्यासाठी ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वी संतोष बांगर यांनी राज्य सरकारलाचा धारेवर धरत महायुती सरकारलाच घरचा आहेर दिला होता. नांदेड येथील शिंदे सेनेच्या आढावा बैठकीत आमदार संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना पक्ष श्रेष्ठींसमोर मांडल्या होत्या. त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोरच त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला होता. त्यांच्या या आक्रमकपणामुळे काही काळ बैठकीचं वातावरण तापलं होतं. गंभीर झालेलं. पण कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला. मनातील खदखद त्यांनी बाहेर काढली. मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. डोक्यात हवा गेलेल्या मंत्र्यांना अगोदर घरी बसवा असा घरचा आहेर आमदार संतोष बांगर यांनी दिला होता.

मतदारसंघात सुद्धा लोकप्रिय

ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असून ऑपरेशन टायगर 2 देखील होणार असं वक्तव्य करत संतोष बांगर यांनी जून महिन्यात केलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं. आमदार बांगर यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड सुद्धा नेहमीच चर्चेत असतात. वादांशी त्यांचं नातं जोडलं जात असलं तरी संतोष बांगर हे त्यांच्या मतदारसंघात सुद्धा लोकप्रिय आहेत.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in