• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sanjay Raut: संपूर्ण भाजपला राहुल गांधींनी कामाला लावलं, 16 आकड्यांचं काय कोडं? संजय राऊतांचा चिमटा, त्या कोड्याचा अर्थही सांगितला

April 18, 2026 by admin Leave a Comment


Sanjay Raut pinched BJP over Rahul Gandhi 16 Digit Code: महिला आरक्षण विधेयक काल लोकसभेत नामंजूर झाले. त्यापूर्वी प्रस्ताव, ठराव पारीत झाला. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी नारी शक्ती वंदन विधेयकावर त्यांची बाजू मांडली. 2023 मध्ये मंजूर झालेले हे विधेयक पुन्हा घटनादुरुस्तीसाठी आताच का आणण्यात येत आहे असा रोकडा सवाल विरोधकांनी विचारला. सपाने अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली. 2026 मध्ये ओबीसी आणि दलित लोकसंख्या आणि आकडेवारी समोर येऊ द्या आणि नंतर हे महिला आरक्षण विधेयक समोर आणा. त्याला आमचा पाठिंबा असेल असे विरोधकांचे म्हणणे होते. सरकारला हे विधेयक पडणार हे माहिती आहे, तरीही सरकार ते रेटत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्याचवेळी त्यांनी 16 नंबरचे कोडं घातलं आणि ते सोडवण्याचे सर्वांना आवाहन केले. त्यानंतर देशाचे राजकारण या 16 क्रमांकाभोवती फिरत आहे.

राहुल गांधी यांचे 16 क्रमांकाचे कोडे?

राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या भाषणाचा उल्लेख केला. तसेच महिला विधेयक हे 16 तारखेलाच संसदेसमोर आणण्यामागे काय कारण असू शकते, असा सवाल करत 16 नंबरचे कार्ड दाखवले. या 16 क्रमांकावरून त्यांनी देशाला कोडं घातलं. या नंबरविषयी कुणाला काही आठवलं, सुचवावं वाटलं तर त्यांनी मला समाज माध्यमांवर थेट संदेश करावा असे आवाहन त्यांनी केले. कोणी समजलं का की मला काय म्हणायचं आहे? असा सूचक सवालही त्यांनी केला. त्यामुळे देशभरात या 16 क्रमांकावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

संजय राऊतांचा भाजपला चिमटा

दरम्यान उद्धव सेनेचे शिलेदार खासदार संजय राऊत यांनी या कोड्यावरून भाजपला चिमटा काढला. राहुल गांधींनी लोकसभेत 16 आकड्याचे कोडे घातले, व ते निघून गेले! संपूर्ण भाजपा कोडे सोडवीत बसली असेल! असा टोला त्यांनी लगावला आहे. सध्या या कोड्याची देशभरात चर्चा सुरू असतानाच राऊतांनी भाजपवर तोंडसुख घेतले आहे. तर त्याचवेळी हे कोडे उलगडण्याचा आणि त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्नही राऊतांनी केला.

राहुल गांधींनी लोकसभेत १६ आकड्याचे कोडे घातले,
व ते निघून गेले!
संपूर्ण भाजपा कोडे सोडवीत बसली असेल!
या कोड्याचा थोडा भाग सांगतो:

१६ Epstein फाइल्स US DOJ वेबसाइटवरून (डिसेंबर २०२५ च्या बॅचमध्ये) गायब झाल्या.
त्या फाईल्स मध्ये काय आहे?
Adani SEC US फ्रॉड केसची तक्रार: पेज १६ ऑफ…

— Sanjay Raut (@rautsanjay61) April 17, 2026

राऊतांकडून कोडे उलगडण्याचा प्रयत्न

16 Epstein फाइल्स US DOJ वेबसाइटवरून (डिसेंबर 2025 च्या बॅचमध्ये) गायब झाल्या.

त्या फाईल्स मध्ये काय आहे?

Adani SEC US फ्रॉड केसची तक्रार: पेज 16 ऑफ 39 मध्ये Sagar Adani चे नाव स्पष्टपणे घेतले आहे आणि सोलर ब्रायबरी स्कीम चा तपशील दिला आहे (नोव्हेंबर 2024 मध्ये दाखल).

Adani इंडिक्टमेंट टाइमलाइन: मुख्य भ्रष्टाचाराची घटना 16 डिसेंबर 2021 रोजीची (Gautam Adani आणि Sagar Adani विरुद्ध US चार्जेस).

16 मार्च 2017 Epstein मेसेजेस (Ambani-Epstein फाइल्स): Anil Ambani ने Epstein ला Trump टीम (Kushner/Bannon) सोबत संपर्क साधण्यासाठी मदत मागितली होती, मोदींच्या US भेटीसाठी.

Trump कथितरित्या Epstein फाइल्स + Adani US केसचा वापर Modi वर ट्रेड डील साठी दबाव म्हणून करत आहे; आता “16” हे या लपवलेल्या फाइल्स/केसेसचे कोड असल्याची चर्चा आहे.

या शिवाय या 16 फाईल्स मध्ये बरीच रहस्य आहेत, असे राऊत यांनी ट्वीट केले आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डिझेल इंजिन आणि ऑटोमॅटिक गिअर! ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 5 कार, किंमत 9.8 लाखांपासून सुरू
  • Pravin Togadia : वाईट नियत ठेऊन महिलांजवळ जाणाऱ्याला बसणार इलेक्ट्रिक शॉक, प्रवीण तोगडिया काय म्हणाले?
  • 45 वर्षीय श्वेता तिवारीने शेअर केले वेकेशन फोटो, फिटनेस आणि सौंदर्य पाहून चाहते थक्क
  • तर लोकशाही संपुष्टात आली असती… मसिहा बनण्याचा प्रयत्न करू नका; प्रियंका गांधी यांनी भाजपला सुनावले
  • Nashik | TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं सर्टिफिकेट? होणार चौकशी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in