
उद्धव ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटणार अशी चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. “खासदार फुटणार अशी चर्चा आहे. पण आमच्यापर्यंत अशा प्रकारच्या कोणत्याही घडामोडीची अधिकृत माहिती नाही. तुमच्या माध्यमातून या बातम्या ऐकून प्रतिक्रिया देत आहोत” असं संजय राऊत म्हणाले. “काल रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास एका महत्वाच्या माणसाचा फोन आला. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतल जातय असं त्यांनी सांगितलं. मी म्हटलं काय भाव आहे? ते म्हणाले हमी भाव तोच आहे 50 कोटी. आज रात्री 15-15 कोटी पोहोचतील. हे पैसे घेतल्याशिवाय ते खासदार विमानात बसायला तयार नाहीत” असा दावा संजय राऊत यांनी केला
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply