
Samantha-Raj : प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभु ही काही काळापूर्वी 'मां इंति बंगारम' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने 100 कोटींपेक्षा अधिक व्यवहार केला होता. त्यासोबतच अभिनेत्री अनेक रेकॉर्ड्सही नावावर केले. प्रोपेशनल आयुष्यासोबत समांथांच्या वैयक्तिक आयुष्यातही बरंच काही घडत असून ती आता आई होणार आहे. तिच्या आयुष्यात लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. (All Photos: Instgram)
ही नवी फेज समांथा चांगलीच एन्जॉय करत आहे. सध्या ती पती राज निदिमोरु याच्यासोबत सुट्टीवर असून निवांत वेळ घालवत आहे. तिने नुकतेच तिच्या बेबीमूनचे काही सुरेख फोटो शेअर केले.
दोघांनी एकमेकांसोबत निवात क्वॉलिटी टाइम घालवला. एका कॅफेत बसलेले दोघे अगदी चिल मूडमध्ये होते. त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद साफ झळकत होता.
तर पुढल्या एका फोटोत समांथा ही तिच्या टेबलवरी खाद्यपदार्थांचा फोटो घेताना दिसली.
सध्या व्हेकेशनवर असलेल्या समांथाचा अतिशय स्टायलिश अंदाजही दिसला. ब्लॅक ड्रेस घातलेल्या समांथाने तिचं बेबी बंप फ्लाँट केलं.
निवांत सुट्टीचे काही फोटो शेअर करताना समांथाने 'Just us' एवढीच छोटीशी कॅप्शनही लिहीली. मात्र त्यासोबतच तिने इव्हिल आय इमोजी आणि बेबी फेसचा इमोजीही लावला होता.
समांथाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा तूफान वर्षाव केला आहे. 1 डिसेंबर 2025 रोजी समांथाने फिल्ममेकर राज निदिमोरु याच्याशी दुसरं लग्न केलं.






Leave a Reply