• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Salman Khan Sister Arpita Khan : 1.88 लाखांची शँपेन, हजारोंचा मासा.. सलमानच्या बहिणीच्या रेस्टॉरंटमधील दर ऐकून घामच फुटेल..

August 21, 2026 by admin Leave a Comment


‘दबंग’ स्टार सलमान खान (Salman Khan) याच्याप्रमाणेच त्याच्या कुटुंबियांबद्दलही जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. सलमानची धाकटी बहीण अर्पिता खानही (Arpita Khan) चर्चेत असते. मुंबईतील आलिशान ‘मर्सी’ या रेस्टॉरंटची ती को-फाऊंडर आहे. 9000 स्क्वेअर फुटांवर पसरलेलं हे आलिशान रेस्टॉरंट त्याच्या उच्चभ्रू इंटिरिअरमुळे आणि हाय-क्लास डायनिगंमुळे एलीट क्लासमध्ये खूपच प्रसिद्धआहे. तिथे युरोपियन अंदाजासोबत एशियन आणि भारतीय चवीचंही कॉम्बिनेशन पदार्थांमधून चाखायला मिळतं.

रेस्टॉरंटमधील पदार्थांचे महागडे दर

पण अर्पिताच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाणं हे जनसामान्यांसाठी स्वप्नच ठरू शकतं, कारण तिथल्या प्रचंड किमती सगळ्यांनाच विशेषत: सामान्य जनतेला परवडतील अशा नाहीतच मुळी.अर्पिता खानच्या रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा अनुभव जितका खास आहे, तितक्याच इथल्या पदार्थांच्या किमतीही चर्चेत आहेत. मध्यमवर्गीयांना या रेस्टॉरंटमधील डिनरचा खर्च परवडणं हे बरंच कठीण ठरू शकतं. इथल्या काही पदार्थांच्या किमती ऐकून तर तुम्हीही आश्चर्याने तोंडात बोटं घालाल.

रेस्टॉरंटमधील सर्वात महागड्या पदार्थांपैकी एक म्हणजे सॉल्ट क्रस्टेड रेड स्नॅपर. या फिश डिशसाठी तब्बल 10 हजार रुपये मोजावे लागतात. संपूर्ण माशाला मिठाच्या थरात बेक करून हा पदार्थ तयार केला जातो. तर दुसरा महागडा पदार्थ म्हणजे पास्ता. अर्पिताच्या रेस्रंटमधील पास्ता खाण्यासाठी तुमच्या खिशाला मोठं भोक पडू शकतं. कारण ट्रफल पास्ता फ्रॉम व्हील हा मेन्यूमधील अत्यंत महागडा पदार्थ आहे. त्याची किंमत तब्बल 8500 रुपये असून, स्पॅगेटी ही Périgord ट्रफल सॉससोबत सर्व्ह करण्यात येते.

ज्यांना सीफूड आवडतं त्यांच्यासाठी सीफूड टेरियाकी सॅल्मनची उपलब्ध आहे, पण त्याची किंमत आहे तब्बल 4 हजार रुपये तर लॉबस्टर थर्मिडोरसाठी 3500 रुपये मोजावे लागतात. कोको लॉबस्टरची किंमतही 1500 रुपये आहे.

ड्रिंक्सच्या किमती ऐकूनही बसेल धक्का !

या रेस्टॉरंटमध्ये फक्त फूडच नाही, तर ड्रिंक्सच्या किमतीही चांगल्याच चर्चेत आहेत. येथील सर्वात महागड्या शॅम्पेनची किंमत दोन लाखांच्या आसपास आहे. तेथील महागड्या शँपेनची किंमत 1,88,550 रुपये इतकी आहे. तर सर्वात महागडी रेड वाइन सुमारे 1.40 लाख रुपये, तर व्हाइट वाइनची किंमत जवळपास 69 हजार रुपये आहे. म्हणजेच, या रेस्टॉरंटमध्ये डिनरचा प्लॅन करताना फक्त भूक नाही, तर बजेटही मोठं असणं गरजेचं आहे! इथला मेन्यू लक्झरी डायनिंगचा अनुभव देतो, पण त्यासाठी खिशालाही तितकीच मोठी किंमत मोजावी लागते.

खान कुटुंबाचीही होते पार्टी 

अर्पिता खान अनेकदा मित्र आणि कुटुंबीयांसोबत या रेस्टॉरंटमध्ये पार्टी करताना दिसते. खान कुटुंबातील अनेक खास सेलिब्रेशन आणि पार्ट्यांसाठीही हे ठिकाण पसंतीचे असल्याचे सांगितलं जाते. काही दिवसांपूर्वी ‘अलायन्स’ या रिॲलिटी शोची पार्टीही मर्सीमध्ये आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला सलमान खाननेही हजेरी लावली होती.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in