• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sai Tamhankar: उद्या मी आई झाले तर..; मातृत्वाबद्दल सई ताम्हणकर पहिल्यांदाच व्यक्त

September 9, 2026 by admin Leave a Comment


मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या ‘अडकित्ता’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत सईने मातृत्व आणि पडद्यावर आईची भूमिका साकारण्यातील फरकावर मनमोकळेपणाने भाष्य केलं. तिच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावरही चर्चा होत आहे. सईने आजवर विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तिरेखेचा अनुभव घेताना कलाकाराला वेगवेगळ्या भावविश्वातून जावं लागतं. आईची भूमिका साकारतानाही हेच होतं. मात्र, अभिनयासाठी एखाद्या आईचं पात्र समजून घेणं आणि प्रत्यक्ष आयुष्यात मातृत्व स्वीकारणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी असल्याचं सईने सांगितलं.

चित्रपट किंवा मालिकेत आईची भूमिका साकारताना त्या पात्राचं वय, परिस्थिती आणि मुलांशी असलेलं नातं समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. लहान मुलाची आई आणि किशोरवयीन मुलाची आई यांच्या वागण्यातही फरक असतो. अभिनयाच्या माध्यमातून कलाकाराला अशा अनेक अनुभवांना सामोरं जाता येतं, असं मत सईने मांडलं. मात्र, हे सगळं पडद्यावर साकारल्यानंतर भविष्यात प्रत्यक्ष मातृत्वाचा अनुभव आला तर तो स्वतःसाठी पूर्णपणे नवीन टप्पा असेल, असं सईने सूचित केलं. कलाकार म्हणून विविध व्यक्तिरेखा जगण्याची संधी मिळणं हे या क्षेत्राचं वैशिष्ट्य असल्याचंही तिने सांगितलं.

‘कलाकृती मीडिया’शी बोलताना सई म्हणाली, “लहान मुलाची आई थोडी वेगळी वागत असेल, किशोरवयीन मुलाची आई थोडी वेगळी असेल.. हे सगळे अनुभव मला माझ्या कामाच्या निमित्ताने घेता येतात. गंमत म्हणजे हे सगळं करून जर उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर वेगळाच प्रयोग होईल.”

सई ताम्हणकरचा ‘अडकित्ता’ हा चित्रपट 11 सप्टेंबर 2026 रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सईसोबत सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आधुनिक काळातील पालकत्व, ऑफिसमधील आयुष्य आणि कुटुंबातील नातेसंबंध अशा विविध विषयांना या चित्रपटाच्या कथानकातून स्पर्श केला जात असल्याचं समोर आलं आहे. सई ताम्हणकरने मराठीसोबतच हिंदी मनोरंजनविश्वातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘मिमी’सारख्या हिंदी चित्रपटातील तिच्या भूमिकेलाही चांगली दाद मिळाली होती.

मातृत्वासारख्या वैयक्तिक विषयावर सईने केलेल्या स्पष्ट वक्तव्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनयात एखादं पात्र साकारणं आणि तेच नातं स्वतःच्या आयुष्यात जगणं यामध्ये किती मोठा फरक असतो, याकडे सईने आपल्या वक्तव्यातून लक्ष वेधलं आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Bigg Boss 20: तिसऱ्याच दिवशी घरात राडा, 4 स्पर्धक नॉमिनेट; बादशाहबद्दल काय म्हणाली ईशा?
  • Sanjay Raut | धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक; चिन्ह गोठवण्याची केली मागणी
  • Manoj Jarange Patil Andolan | तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे पाटलांचा भरत गोगावले यांना थेट इशारा
  • Corporator’s Funds | मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ; 60 लाखांऐवजी आता मिळणार तब्बल…
  • गेल्या 8 महिन्यांपासून OTTवर ट्रेंडमध्ये, 7 एपिसोडची ही सीरिज तुम्ही पाहिलीत का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in