
टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतवर घालण्यात आलेली 3 वर्षांची बंदी अखेर हटवण्यात आली आहे. श्रीसंतवर ही बंदी केरळ क्रिकेट असोशिएशनने घातली होती. मागच्यावर्षी श्रीसंत केसीएबद्दल जे बोलला, त्यासाठी त्याच्यावर ही बंदी घालण्यात आलेली. (PC-SREESANTH INSTAGRAM)
श्रीसंतवरील बंदी हटवल्यानंतर केसीएसने प्रेस रिलीज जारी केली. श्रीसंतने बिनशर्त माफी मागितल्याने हा निर्णय घेतल्याचं केरळ क्रिकेट असोशिएशनने म्हटलं आहे. श्रीसंतने केसीएस बद्दल केलेल्या टिप्पणीवर खेद व्यक्त केला. (PC-SREESANTH INSTAGRAM)
संजू सॅमसनचं सिलेक्शन झालं नाही म्हणून श्रीसंत हे बोलला होता. विजय हजारे ट्रॉफीसाठी असोशिएशनने जाणीवपूर्वक संजू सॅमसनची टीममध्ये निवड केली नाही. त्यामुळे त्याचं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सिलेक्शन झालं नाही असा आरोप श्रीसंतने केला होता. आता मात्र श्रीसंतने त्याच्या या वक्तव्यासाठी माफी मागितली आहे. (PC-SREESANTH INSTAGRAM)
श्रीसंतचं संपूर्ण करिअर हे वादांनी भरलेलं आहे. एका वादामुळे त्याचं करिअर जवळपास संपुष्टातच आलं. 2013 साली आयपीएलमध्ये तो स्पॉट फिक्सिंगच्या वादात अडकला होता. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर आयुष्यभरासाठी बंदी घातली. पण अखेरीस त्याला कोर्टाकडून क्लीन चीट मिळाली. (PC-GETTY IMAGE)
श्रीसंत टीम इंडियाकडून 27 कसोटी सामने खेळला. त्यात त्याने 87 विकेट काढले. 53 वनडेमध्ये 75 गडी बाद केले. 10 टी 20 सामन्यात त्याच्या नावावर 7 विकेट आहेत. 2007 टी 20 वर्ल्ड कप आणि 2011 वनडे वर्ल्ड कप विजेत्या टीमचा श्रीसंत भाग होता. (PC-SREESANTH INSTAGRAM)




Leave a Reply