
रुपाली चाकणकर भोंदू प्रकरणानंतर जास्त चर्चेत आल्या. त्यांच्यावर या प्रकरणी अनेक आरोप करण्यात आले. हे सर्व आरोप त्यांनी फेटाळले, मात्र त्यांनी आता अब्रुनुकसानीचा आरोप केला आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात सोबतच्या व्हायरल काही फोटोमुळे त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते.
रुपाली चाकणकरांनी आशा मिरगे यांच्याविरोधात कोर्टात तक्रार केली आहे. त्यांनी अब्रुनुकसानी विरोधात फौजदारी तक्रार दाखल केल्याचं समोर आलं आहे. JMFC माझगाव कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आशा मिरगे या राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आहेत.
भोंदू खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर अत्तापर्यंत अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. एसआयटी या प्रकरणातील संबंध तपास करत आहे.
Leave a Reply