• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rohit Sharma : पुन्हा तळपणार ‘हिटमॅन’ची बॅट ? रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, लवकरच…

August 15, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात शानदार शतक झळकावत रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या टीकाकारांना दमदार उत्तर दिलं. मात्र, या जबरदस्त खेळीनंतरही त्याच्या वनडे कारकिर्दीबाबतचे तर्कवितर्क, चर्चा थांबलेली नाही. विशेषतः 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये रोहित हा भारतीय संघाचा भाग असेल की नाही, यावर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. तो पुन्हा खेळताना दिसणार काी नाही, याची चिंता क्रिकेटप्रेमींना सतावत आहे. मात्र याचदरम्यान, रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. पुढील महिन्यात, म्हणजेच सप्टेंबरमध्ये, रोहित पुन्हा एकदा मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश होऊ शकतो. त्यामुळे पुन्हा त्याची बॅट तळपण्याची शक्यता असून क्रिकेट चाहत्यांना अद्भुत खेळ पहायला मिळू शकतो.
रोहितला मिळणार आणखी संधी?
रोहितच्या भवितव्यावर बीसीसीआय आणि निवड समितीमध्ये चर्चा सुरू असल्याचे बोललं जात होतं. आता मात्र त्याला तातडीने संघाबाहेर करण्याऐवजी आणखी संधी देण्याच्या दिशेने निर्णय झाल्याचं मानलं जात आहे. त्यानुसार, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत रोहितला आपली क्षमता पुन्हा सिद्ध करण्याची संधी मिळेल. आगामी 2027 वर्ल्ड कपचा विचार करता, या मालिकेतील त्याची कामगिरी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे रोहितचा अनुभव आणि आक्रमक फलंदाजी पुन्हा एकदा भारतीय संघासाठी निर्णायक ठरू शकते.
रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम?
इंग्लंड दौऱ्यादरम्यान रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो, अशा चर्चांना उधाण आलं होतं. युवा फलंदाजांना संधी देण्यासाठी रोहितला बाजूला केलं जाऊ शकतं, अशीही बरीच चर्चा सुरू होती. लॉर्ड्समधील सामना त्याचा अखेरचा वनडे ठरू शकतो, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. मात्र,त्यावर स्पष्ट काहीही भाष्य न करता, रोहितने आपल्या बॅटनेच या सर्व चर्चांना उत्तर दिले.  आपण अजूनही मोठ्या सामन्यांमध्ये प्रभाव पाडू शकतो, हे त्याने लॉर्ड्समध्ये शतक ठोकत दाखवून दिलं.
आता प्रत्येक मालिकेत होणार कामगिरीचं मूल्यमापन
रोहितच्या भवितव्याबाबत बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचेही सांगितलं जात आहे. त्यानंतर त्याला आणखी काही संधी देण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पुढील काळात  मालिकेनुसार त्याच्या कामगिरीचं मूल्यमापन  केलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा अर्थ असा की, वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका रोहितसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.
आगरकर यांच्या भवितव्यावरही निर्णय?
दरम्यान, मुख्य निवडकर्ता अजित अगरकर यांच्या भवितव्याबाबतही चर्चा सुरू आहे. भारतीय संघाने अलीकडील मोठ्या आयसीसी स्पर्धांमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर आगरकर यांचा कार्यकाळ 2027 वर्ल्ड कपपर्यंत वाढवला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, श्रीलंका कसोटी मालिकेनंतर बीसीसीआयची महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात आगरकर यांच्या पुढील कार्यकाळाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
 रोहित शर्माच्या भवितव्याबाबत निवड समिती आणि बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्याचंह वृत्त समोर आलं होतं. निवड समिती संघात बदल करण्याच्या विचारात असताना बोर्डाचे सचिव देवजीत सैकिया यांनी रोहित संघाच्या योजनांमध्ये असेपर्यंत तो खेळत राहील, अशी भूमिका मांडली होती असं बोललं जात आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in