• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rohit Pawar : रोहित पवार यांचं तुकाराम मुंढे यांच्यावर मोठं विधान; फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी

August 16, 2026 by admin Leave a Comment


वैभव घाग, टीव्ही9 

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने पान मसालाच्या जाहिरातीवरून बॉलिवूडच्या तीन मोठ्या कलाकारांना कारणे दाखवा नोटीस पाठवल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मुंढे यांच्या विभागाने अजय देवणग, शाहरुख खान, टायगर श्रॉफ यांना जाहिरातीत सहभागी झाल्याने नोटीस पाठवल्याचे समोर आलं आहे. मुंढे यांच्या विभागाच्या कारवाईवर रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्यांना नोटीस पाठवण्याऐवजी विमल कंपनीच्या नोटीस द्या, असे पवार म्हणाले. तर मुंढे यांना अंमली विरोधी पथकाचे प्रमुख करा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईवर रोहित पवार म्हणाले, ‘नोटीस देण्याचा अधिकार त्यांना असेल, तर त्या विमल कंपनीच्या मालकाला नोटीस द्या. अभिनेत्यांना कशाला…? कलाकारांना नोटीस देता म्हणजे तुमची अपेक्षा आहे का त्यांनी तुमची कार्यालयात यावं. आता अंमली विरोधी पथकाचा विभाग आहे, त्याचे प्रमुख तुकाराम मुंडे यांना करा. ते पान मसालाला इतकं गांभीर्याने घेत आहेत, तर अंमली पदार्थालाही देतील. एकच अधिकारी दिसत असेल, तर बाकीच्या अधिकाऱ्यांना काम करत नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. फक्त एका अधिकाऱ्याला मीडिया हायलाईट दिली जात आहे. तर काम करणारे इतर अधिकारी देखील आहेत, त्यांनाही दाखवा’.

कुंभमेळ्यात घोटाळा झाल्याचा आरोप करत रोहित पवारांनी म्हटलं की, ‘ अघोषित पालकमंत्री हे गिरीश महाजन आहेत. त्यांना का अघोषित केलं आहे, कारण 30 कोटींची काम तिथे सुरू आहेत. महाजन यांच्या जवळयांच्या लोकांनी टेंडर घेतले. त्यांनी आर्थिक लाभ घेतला. आर्थिक कामाची महाजन यांच्यावर जबाबदारी आहे. भुजबळ काय बोलतात हे आता बघावं लागेल. अघोषित पालकमंत्री असून महाजन त्यांनी महाकुंभची जबाबदारी घेतली आहेत, त्यात भ्रष्टाचार झाला आहे. पैसा कसा खाल्ला जातो, हे पाहिलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना मी जे पत्र दिल होतं, ते प्रसिद्ध करतो. मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती करतो की, पूर्ण माहिती कोणी टेंडर भरले याची दिली पाहिजे.
कामं कोणाला दिली जातात हे माहित आहे. येत्या 18 तारखेला एक खूप मोठं आंदोलन मराठी कंत्राटदार करणार आहेत. विमानावर विमान गुजराती कंत्राटदारांकडून घेतले जात आहेत’.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in