• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rohit Pawar : मुख्यमंत्र्यांकडून शब्दांचा खेळ, गुन्हेगारीत महाराष्ट्र UP,बिहारच्या पुढे चाललाय; रोहित पवारांकडून जुन्नरच्या घटनेवरून संताप

August 19, 2026 by admin Leave a Comment


पुण्यातील जुन्नरमध्ये एका 10 वर्षीय चिमुकलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. नसरापूरसारखीच घटना जुन्नरच्या पिंपळवडीमध्ये घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सत्ताधारी आमदाराच्या गावातच चिमुकलीवर अत्याचार करून हत्या झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेवरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनीही संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे. गुन्हेगारीत आता महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पुढे चालला आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी जुन्नरच्या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे.

रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर संताप 

रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवारांनी चिमुकलीच्या हत्येवरून संताप व्यक्त केला. रोहित पवार म्हणाले, ‘
स्थानिक आमदार हे सत्ताधारी आहेत. त्यांच्या गावात अशा घटना घडत असतील, तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती किती हलाखीची झाली आहे, हे सिद्ध होत आहे. अनेक वेळा हा मुद्दा घेतला. अधिवेशनात हा मुद्दा उचलला. ज्या मुलींवर अत्याचार झाले, त्या पीडित कुटुंबाला याची किंमत मोजावी लागली आहे. आम्ही या पीडित कुटुंबांनाही भेटलो. त्यासोबत वकिलांना देखील भेटलो’.

महाराष्ट्रात शक्तीसारखा कायदा आणा  – रोहित पवार 

‘सातत्याने काही आकडे सरकारसमोर मांडत आहोत. खरंतर शक्तीसारखे कडक कायदे महाराष्ट्रात आणावा लागेल. दुर्दैवाने असं की, देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. ते शब्दाचा खेळ करतात. आकडेवारीतून सांगतो की, महाराष्ट्र उत्तर प्रदेश, बिहारच्या पुढे चालला आहे. परंतु मुख्यमंत्री फडणवीस हे आकडेवारीचा खेळ करून यावरील लक्ष दुसरीकडे नेतात. महाराष्ट्रात अत्याचार होत आहेत. मुली, महिलांवर अत्याचार होत आहेत. अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा आणि पोलिसांची भीती कमी झाली आहे. पोलिसांचा वापर हा व्हिआयपी, आमदार, खासदारांना संरक्षण देण्यासाठी वापरला जात आहे. त्यामुळे सामान्य घरातील मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहे, असा आरोप रोहित पवारांनी केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in