
बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा आजही आपल्या सौंदर्याने, ग्रेसफुल व्यक्तिमत्त्वाने आणि फिटनेसने लोकांचे लक्ष वेधून घेते. तिचं वय जवळपास 71 वर्षे आहे, पण तिचा चेहऱ्याकडे आणि फिटनेसकडे पाहिल्यावर तिच्या वयाचा अंदाज लावणे कोणालाही कठीण जाईल. अनेकदा लोकांना आश्चर्य वाटते आणि प्रश्न पडतो की रेखाकडे अशी कोमती जादू आहे, ज्यामुळे तिचं वय जाणवत नाही. पण यात काही जादू किंवा रहस्य नाही, तर रेखा ही गेल्या अनेक वर्षांपासून संतुलित लाइफस्टाइल मेंटेन करते तसेच शिस्तशीर जगते, त्याचा हा परिणाम आहे. तिच्या आहाराकडे आणि इतर सवयींकडे पाहिल्यास, या वयातही तिने स्वतःला इतकं फिट आणि मेंटेन कसं ठेवलंय, याचा अंदाज सहज येऊ शकतो. (All Photos : Social Media)
अनेक रिपोर्ट्सनुसार, रेखाला घरचं बनवलेलं साधं आणि पौष्टिक जेवण आवडतं. तिच्या आहारात भरपूर हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्ये आणि डाळी यांचा समावेश असतो. विशेषतः ती उकडलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करते. यासोबतच ती सॅलड आणि अंकुरित धान्ये (स्प्राउट्स) देखील खाते. जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थांपासून ती दूर राहते. याशिवाय हेल्दी फॅट्स आणि प्रोबायोटिक्ससाठी ती कडधान्यं, नट्स आणि योगर्ट यांचाही आहारात समावेश करते.
रेखा फक्त खाण्याकडेच नव्हे तर जेवणाच्या वेळेकडेही लक्ष देते. संध्याकाळी साडेसातच्या आत ती शेवटचं जेवण घेते. तसेच रात्रीच्या जेवणात ती हलके पदार्थ खाणं पसंत करते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्रीचे जेवण लवकर करणे ही एक चांगली सवय आहे. कारण यामुळे जेवण आणि झोप यामध्ये पुरेसे अंतर मिळते, ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होण्यास मदत होऊ शकते.
दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्यायलं जाईल याकडे रेखाचा कटाक्ष असतो. ती दिवसाला सुमारे 10 ते 12 ग्लास पाणी पिते, त्यामुळे तिच्या त्वचेचा नैसर्गिक ग्लो टिकून राहण्यास मदत होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि त्याचा आरोग्यासोबतच त्वचेलाही फायदा होऊ शकतो.
रेखाच्या जबरदस्त फिटनेसच्या मागे तिची नियमित व्यायाम करण्याची सवयही महत्त्वाची आहे. ती दररोज योग आणि प्राणायाम करते. तसेच कार्डिओ आणि डान्स करायलाही तिला आवडतं. या सर्व शारीरिक हालचालींच्या संयोजनामुळे ती फिट राहते आणि त्वचेवरही नैसर्गिक चमक दिसून येते.
रेखा केवळ शारीरिक आरोग्याचीच नाही, तर मानसिक आरोग्याचीही पूर्ण काळजी घेते. एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की मेडिटेशन (ध्यान) केल्याशिवाय राहू शकत नाहीत. दररोज प्राणायाम, योग आणि ध्यान यांच्या संयोजनामुळे तिचं मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. यासोबतच पुरेशी झोप घेण्यावरही ती भर देते. दररोज ठरलेल्या वेळेत झोपणे आणि त्याच वेळेत उठणे हा तिच्या दिनक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे.





Leave a Reply