
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 23 व्या सामन्यात होम टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील एकूण पाचवा आणि एकमेकांविरूद्धचा पहिला सामना आहे. रजत पाटीदार याच्याकडे आरसीबीच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर ऋषभ पंत लखनौचं नेतृत्व करणार आहे. उभयसंघातील सामन्याला 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. आरसीबीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन रजतने घरच्या मैदानात चेजिंग करण्याचा निर्णय घेत लखनौला बॅटिंगसाठी बोलावलं आहे.
दोन्ही संघांची कामगिरी
लखनौची या मोसमातील आतापर्यंत कामगिरी 50-50 अशी राहिली आहे. लखनौने ऋषभ पंत याच्या कॅप्टन्सीत 2 सामने जिंकले आहेत. तर लखनौला 2 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. तर बंगळुरुने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत.
प्लेइंग ईलेव्हनबाबत अपडेट
लखनौने आरसीबी विरुद्ध प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. लखनौ त्याच 11 खेळाडूंसह खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आरसीबीने एकमेव बदल केला आहे. जोश हेझलवूड याचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे जेकब डफी याला बाहेर व्हावं लागलं आहे.
विराट कोहली इम्पॅक्ट प्लेअर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर सहभागी होणार आहे. त्यामुळे विराट इम्पॅक्ट सोडण्यात यशस्वी ठरणार का याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्करम, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, अब्दुल समद, मुकुल चौधरी, मोहम्मद शमी, आवेश खान, दिग्वेश सिंग राठी आणि प्रिन्स यादव.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, देवदत्त पडीक्कल, रजत पाटीदार (कॅप्टन), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड, सुयश शर्मा आणि रसिक सलाम दार.
Leave a Reply