• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RCB vs LSG : ऋषभ पंतने तीन चेंडू निर्धाव सोडले आणि सामना सोडला, लखनौचं टेन्शन वाढलं

April 15, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 23व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. या सामन्यात आरसीबीचा वरचष्मा दिसत आहे. तर लखनौ सुपर जायंट्स विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्नात आहे. नाणेफेकीचा कौल आरसीबीने जिंकला आणि रजत पाटीदार याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सवर 200 पार धावांचं लक्ष्य ठेवण्याचा दबाव होता. त्याचं दडपण पहिल्या षटकापासून दिसून आलं. मिचेल मार्श आणि एडन मार्करम ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने पहिल्या षटकात 9 धावा केल्या. दुसर्‍या षटकात 5, तिसऱ्या षटकात 8 धावा आणि चौथ्या षटकात 10 धावा आल्या. चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एडन मार्करमची विकेट पडली. त्यामुळे धावगती वाढवण्याच्या दबावासह कर्णधार ऋषभ पंत मैदानात उतरला. पाचवं षटक टाकण्यासाठी जोश हेझलवूड मैदानात आला आणि या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ऋषभ पंतला मैदान सोडावं लागलं.

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मिचेल मार्शने एक धाव घेतली आणि ऋषभ पंतला स्ट्राईक दिली. दुसऱ्या चेंडूचा सामना करताना निर्धाव गेला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरही धाव घेण्यात अपयश आलं. पण या षटकातील चौथ्या चेंडू सामना करताना ऋषभ पंत चुकला आणि त्याला जोरात चेंडू लागला. त्यामुळे ऋषभ पंत कळवळला. हा चेंडू त्याच्या त्याच्या कोपराला लागल्याने वेदना होत होत्या. त्यामुळे फिजिओ धावत मैदानात आले. पण दुखापत खूप होत असल्याने पंतने मैदान सोडलं. पंत मैदानाबाहेर जात असताना हेझलवूडने पाठीवर थाप मारली. पंतला वेदना जाणवत होत्या. इतकंच काय त्याच्या डोळ्यात जवळजवळ अश्रू आले.

A worrying moment in this blockbuster clash 👀😟@RishabhPant17 walks off retired hurt after a blow to the elbow, concern in the LSG camp as he leaves the field 🤕

Big setback or just a scare? 👀#TATAIPL | #IPLRivalryWeek 2026 ➡ #RCBvLSG | LIVE NOW 👉 https://t.co/nyGp1mrMqj pic.twitter.com/ASMS401DCX

— Star Sports (@StarSportsIndia) April 15, 2026

ऋषभ पंतची दुखापत किती गंभीर आहे काही कळू शकलेलं नाही. या सामन्यात क्षेत्ररक्षणासाठी उतरणार की नाही याबाबतही शंका आहे. ऋषभ पंत माघारी घेल्यानंतर निकोलस पूरन मैदानात उतरला. त्याने या सामन्यात 7 चेंडूंचा सामना केला आणि 1 धाव करून बाद झाला. जोश हेझलवूडने त्याचा त्रिफळा उडवला. त्यामुळे या विकेटनंतर लखनौ सुपर जायंट्सच्या धावगतीला ब्रेक लागला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vinod Kambli : विनोद कांबळीला ब्रेनस्ट्रोकचा भयंकर धोका, धक्कादायक माहिती मिळताच सचिनसह सर्वच मित्र मदतीसाठी धावले
  • 16 April Horoscope : 4 राशींचं नशीब फळफळणार, चालून आला खूपच दुर्मिळ योग; वाचा काय घडणार?
  • 23000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी? TCS च्या एचआरने सांगितले सत्य, वाचा…
  • या देशात चक्क भाड्याने मिळते बायको; द्यावे लागतात फक्त एवढे पैसे, दरवर्षी हजारो भारतीय जातात फिरण्यासाठी
  • वेषांतर, लैंगिक अत्याचार, धर्मांतर…नाशिक आयटी कंपनी प्रकरणात पोलिसांचे खळबळजनक खुलासे; धक्कादायक सत्य समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in