
ओपनर साई सुदर्शन याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. गुजरातने बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 205 धावा केल्या. बंगळुरुने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आतापर्यंत स्पर्धेच्या इतिहासात एकूण 49 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आरसीबीला गुजरातला पराभूत करुन चिन्नास्वामीत विजयी अर्धशतक करण्याची संधी आहे. आता आरसीबी घरच्या मैदानात विजय मिळवून अर्धशतक झळकावणार की गुजरात चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एकूण तिसरा सामना जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Leave a Reply