• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rakshabandhan 2026: रक्षाबंधनाच्या दिवशी ग्रहणाचं सावट, राखी बांधणं ठरणार का शुभ की अशुभ?

August 15, 2026 by admin Leave a Comment


भारतीय संस्कृतीत रक्षाबंधन हा पवित्र सण मानजला जातो. या सणाला भाऊ-बहिणींमधील अतूट प्रेम, भक्ती आणि विश्वासाचे सर्वात मोठे प्रतीक मानला जाते. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला हा सण येतो. पण यंदा या सणाची खूपच चर्चा रंगली आहे, याचे मुख्य कारण म्हणजे 28 ऑगस्ट 2026 रोजी होणारे चंद्रग्रहण. या परिस्थितीमुळे, ग्रहणाच्या वेळी राखी बांधणे शुभ असेल की अशुभ, याबद्दल आता शंका निर्माण होत आहे. पंचांगानुसार, यंदा नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाचा सण 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरा होईल. मात्र, यंदाच्या रक्षाबंधनावर ‘खंडग्रास चंद्रग्रहणाचे’ मोठे सावट असल्याचे समजत आहे. ग्रहणाचा ‘सुतक काळ’ आणि राखी बांधण्याची योग्य वेळ याबद्दल लोकांच्या मनात अनेक खूप शंका आहे.

28 ऑगस्टला चंद्र ग्रहण लागणार असून पंचांगानुसार, ग्रहण सकाळी 6:55 वाजता सुरू होईल आणि दुपारी 12:30 वाजेपर्यंत संपणार आहे. अनेक लोक ग्रहणाबद्दल चिंतेत आहेत, परंतु हे चंद्रग्रहण भारतात दिसणारच नाहीये. ज्या भौगोलिक प्रदेशात ग्रहण दिसत नाही, तिथे सूतक काळ वैध नसतो असे म्हटले जाते. सूतक काळ हा ग्रहण सुरू होण्याच्या काही तास आधीच सुरू होतो. तर ग्रहण संपेपर्यंत चालूच राहतो. पण हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने भारतात ग्रहणाचे दोष उद्भवणार नाहीत. यामुळे रक्षाबंधन साजरी करताना काहीच विघ्न येणार नाही.

रक्षाबंधनाचे शुभ मुहूर्तावर राखी बांधणे सर्वोत्तम मानले जाते. 28 ऑगस्ट रोजी राखी बांधण्यासाठी अनेक शुभ मुहूर्त एक नाहीतर अनेक शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वोत्तम वेळ सकाळी 06:23 ते 09:47 अशी असणार आहे. याशिवाय दुपारी 12:14 ते 01:05 दरम्यान अभिजित मुहूर्त आहे, तर संध्याकाळी 06:57 ते 07:19 दरम्यान संधिप्रकाशाची वेळ अत्यंत शुभ मानली जाते.

यामुळे तुम्ही बिनधास्त रक्षाबंधन साजरी करर शकतात. चंद्रगहणाचे सावट जरी असले तरीही त्याचा भारतीय लोकांना परिणाम होणार नसल्याने आता चिंताच मिटली आहे.

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. tv9 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in