• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Raja Shivaji OTT Release: बॉक्स ऑफिसवरील टाईम ओव्हर, ‘राजा शिवाजी’ सिनेमा ओटीटीवर धडकणार, कधी आणि कुठे येणार पाहता?

June 23, 2026 by admin Leave a Comment


Raja Shivaji OTT Release: अभिनेता रितेश देशमुख स्टारर आणि दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केल्यानंतर सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात रितेश याने मुख्य भूमिका साकारली आणि चाहत्यांना अभिनेत्याची भूमिका आवडली देखील. ‘राजा शिवाजी’ सिनेमात अभिनेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला. चाहत्यांनी देखील सिनेमाला डोक्यावर घेतलं. आता ‘राजा शिवाजी’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तर जाणून घ्या रितेश देशमुख स्टारर ‘राजा शिवाजी’ सिनेमा घरबसल्या कुठे आणि कधी पाहता येईल…

ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार ‘राजा शिवाजी’ सिनेमा?

‘राजा शिवाजी’ या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत मोठा इतिहास रचला आहे. आता हा सिनेमा ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवरही धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. याचा अर्थ असा की, ज्यांनी हा सिनेमा चित्रपटगृहात पाहिला नाही, ते आता घरबसल्या याचा आनंद घेऊ शकतील. ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा 26 जून, शुक्रवारी ‘नेटफ्लिक्स’ (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, या प्लॅटफॉर्मकडून अद्याप कोणत्याच प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

‘राजा शिवाजी’ सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन?

सिनेमाच्या बजेटबद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार, सिनेमाने 100 कोटींमध्ये तयार झाला आहे… तर सिनेमाची कमाई 130 कोटी आहे… मराठी सिनेविश्वात 100 कोटींचा गल्ला पार करणारा ‘राजा शिवजी’ सिनेमा पहिला सिनेमा ठरला आहे. ‘राजा शिवाजी’ सिनेमानंतर मराठी सिनेमाचे चांगले दिवस आले.. असं म्हणायला हरकत नाही.

‘राजा शिवाजी’ सिनेमातील स्टार कास्ट

सिनेमाचं दिग्दर्शन रितेश देशमुख याने केलं असून, सिनेमात मुख्य भूमिका देखील त्यानेच साकारली आहे… ‘राजा शिवाजी’ सिनेमात रितेश देशमुख याच्यासह जय दत्त, जिनिलिया देशमुख, महेश मांजरेकर, अभिषेक बच्चन, विद्या बालन, अमोल गुप्ते, भाग्यश्री… यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिनेमात अभिनेता सलमान खान याने देखील पाहुण्या कलाकारची भूमिका साकारली. सिनेमा 1 मे 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डोळ्यातून अश्रूच्या धारा, कोणी जोडले हात, कुणाचा संताप, आदिवासी विद्यार्थ्याची प्रकृती खालावली, सरकार हस्तक्षेप करणार?
  • CID बंद होण्यामागे अंतर्गत राजकारण? दयाचा धक्कादायक दावा; लता मंगेशकरांनी निर्मात्यांना घेतलं होतं फैलावर
  • Kangana Sharma : कास्टिंगच्या नावाखाली नको ती मागणी, अभिनेत्रीला आला हादरवणारा अनुभव
  • खूपच गोड दिसतेय.., पिवळ्या साडीमधील ही अप्सरा कोण? सौंदर्याने लावलं चाहत्यांना वेड
  • भारताने 500 धावांचा पल्ला कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा गाठला आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in