• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rain Alert : मान्सून कुठे-कुठे बसरणार? महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये पावसाची शक्यता, IMD चा अंदाज आला

July 17, 2026 by admin Leave a Comment


संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला असला तरी गेल्या काही दिवपांसून पावसाचा जोर कमी झालेला आहे. अशातच आता उद्या 18 जुलै रोजी देशातील बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. तर पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी कोसळू शकतात. राज्याच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल ते जाणून घेऊयात.

मध्य आणि पूर्व भारतात पावासाच्या सरी

मध्य आणि पूर्व भारतात उद्या मान्सून सक्रिय राहणार आहे. मध्य प्रदेशातील अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ओडिशामध्येही अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे नद्या आणि नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र, गोवा, गुजरातसह पश्चिम आणि दक्षिण भारतात पाऊस कोसळणार

पश्चिम आणि दक्षिण भारतातही मान्सून सक्रिय राहणार आहे. गोवा, गुजरातमधील काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. किनारी कर्नाटक, केरळ आणि माहे येथे व्यापक पावसाचा अंदाज आहे. अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि रायलसीमा भागात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. तामिळनाडू आणि पुदुच्चेरीतील काही भागांतही हलक्या पावसाची शक्यता आहे.

ईशान्य भारतात कसे असेल हवामान?

शनिवारी अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत मुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. डोंगराळ भाग आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये भूस्खलन तसेच वेगवान पाण्याच्या प्रवाहाच्या धोक्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

पंजाबमध्ये उष्णता आणि दमट वातावरणाची शक्यता

पंजाब आणि चंदीगडमध्ये मान्सून कमकुवत झाला असल्याने उष्णता आणि दमट वातावरणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. चंदीगड येथील हवामान केंद्राने फिरोजपूर, फाजिल्का, फरीदकोट, मुक्तसर साहिब, मोगा, बठिंडा, बरनाला आणि मानसा जिल्ह्यांसाठी उष्णता व दमट वातावरणाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर पठाणकोट, गुरदासपूर, होशियारपूर, नवांशहर, फतेहगड साहिब, रूपनगर आणि मोहालीच्या काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in