• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rahul Narvekar : ..तर पक्ष फुटणार नाहीत, सुप्रीम कोर्टात खटला सुरु असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं महत्वाचं विधान

August 21, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्रातील ‘जेन-झी’ (Gen-Z) महाराष्ट्रासोबतच आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या बैठका या कधीही कुठल्या ‘ऑपरेशन’ साठी होत नाहीत. मला वाटतं कुठल्याही पक्षाने अंतर्गत लोकशाहीचा वापर करून आपल्या लोकप्रतिनिधींच्या भावना समजून घेतल्या तर पक्ष फुटणारच नाहीत, अशी टिप्पणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पंढरपुरात केली आहे.एकीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह यावर मॅरेथॉन सुनावणी सुरु असताना त्यांनी हे वक्तव्य केल्याने ते चर्चेत आले आहेत.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज पंढरपुरात स्वेरीज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे जेन- झी पिढीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी राजकीय प्रश्नांवर भाष्य करताना ही टिप्पणी केली. तसेच धनुष्यबाणा संदर्भात सुरू असलेला खटला हा न्यायप्रविष्ठ प्रश्न आहे आणि आपण विधानसभा अध्यक्ष आणि कायद्याचा विद्यार्थी असल्याने यावर बोलणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

राहुल गांधी सध्या ‘जेन-झी’ (Gen-Z) सोबत आंदोलन करीत आहेत. पण , भारत हा सर्वात्तम देश घडवण्याचे काम युवापिढी करत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी भान ठेवावे. आपल्या राजकारणासाठी युवा पिढीला चेतवून राजकारण करण्याचे काम करू नये. राजकारण सोडून युवा पिढीला योग्य मार्गदर्शन करावे, असाही सल्ला यावेळी राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेत बसून युवकांच्या अपेक्षा, इच्छा आहेत , त्यापूर्ण करायच्या असतील आणि त्या संदर्भातील कायदे करण्याचे निर्णय घ्यायचे असतील. तर युवकांशी संवाद साधणे गरजेचे आहे. यासाठीच आपण जेन – झीशी संवाद साधला असल्याचेही नार्वेकर यांनी सांगितले..

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in