
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता. त्याची चौकशी सुरू आहे. याच पॅलेट गन पीडित तरुणालाला घेऊन राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी अनेक तासं ठिय्या दिल्यावर अखेर पोलीस झुकले, पोलिसांनी 31 दिवसानंतर एफआयआर नोंदवण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, हे न्यायाच पहिलं पाऊल आहे, असं ते म्हणाले.
“एका तरुणावर अन्याय झाला आहे. तो साडेअकरा वाजता आला होता आणि आता पावणे सात वाजले आहेत; आता कुठे एफआयआर दाखल झाली आहे. आम्हाला 8 तास लागले. जेव्हा दिल्लीत न्याय मिळत नाही, तेव्हा विचार करा की गावांमध्ये काय परिस्थिती असेल. पोलिसांची इच्छा होती की एफआयआर दाखल व्हावी, पण वरून त्यावर बंदी घालण्यात आली होती.”, असं राहुल गांधी यांनी नमूद केलं.
ही बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply