
काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात असून ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात सहभागी झाले. सभास्थळी मोठ्या उत्साहाने आलेल्या तरूणाईशी, जेन-झी शी त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. पुण्यातील कार्यक्रमात संबोधित करताना राहुल गांधी यांनी मनुस्मृतीवर मोठं भाष्य केलं . “ मनुस्मृतीने महिलांना 3 चौकटीत बसवलं. महिलांना स्वातंत्र्य नाही असा मनुस्मृतीचा विचार ” असं राहुल गांधी म्हणाले. विद्येचे माहेर समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमासाठी काँग्रेसकडून गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी सुरू होती. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते याच कार्यक्रमासाठी पुण्यात ठाण मांडून बसले होते. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी दिलखुलास संवाद साधला. पुण्यातील या कार्यक्रमाला मुलींची, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तरुणींच्या भविष्याबद्दल बोलताना राहुल गांधी यांनी काँग्रेसचं व्हिजनही सांगितलं.
“ तुम्ही सर्वजण विशेष आहात. जेव्हा लोक मला विचारतात की भारताची ताकद काय आहे, तेव्हा मी सांगतो की 70 कोटी भारतीय महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे” असं या कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी म्हटलं. महिलांना हिंसा आणि अनादराच्या माध्यमातून नियंत्रित केले जाते असंही ते म्हणाले.
बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply