
काँग्रेस नेते राहुल गांधी आज छात्रो की गूंज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर आहेत. भारत जोडो यात्रेनंतर सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत राहुल गांधी आज पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी ४:३० ते ९:३० या वेळेत एआयएसएसएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. काँग्रेसच्या वतीने या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे.
सुमारे २५,००० विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असा काँग्रेसचा अंदाज आहे. मैदानावर पंडाल उभारण्यात आले असून, सुसज्ज व्यासपीठ आणि आसनव्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थिनींसाठी विशेष जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थिनी राहुल गांधींना ऐकण्यासाठी येतील अशी अपेक्षा आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात तळ ठोकला होता.
Leave a Reply