• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pushkar Jog: इथे15-15 कोटी कमावता तुम्ही आणि मराठी शिकता येत नाही? पुष्कर जोग संतापला

August 18, 2026 by admin Leave a Comment


मराठी भाषा आणि मराठी कलाकार हा विषय कायमच चर्चेत असतो. कार्यक्रमांमध्ये हिंदी स्टार्सना पहिल्या रांगेत आणि मराठी कलाकारांना मागच्या रांगेत बसवलं जातं, मराठी कलाकारांना कमी लेखलं जातं असं अनेकदा आपण कलाकारांच्या तोंडून ऐकलं आहे. आता फिल्म खरेदी करणारा एकही मराठी माणूस नसल्यामुळे मराठी चित्रपटांना प्राधान्य दिलं जात नसल्याचे अभिनेता पुष्कर जोगने म्हटले आहे. पुष्करने नुकताच फिल्म इंडस्ट्रीमधील मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित केला आहे. तो नेमकं काय म्हणाला? वाचा..

काय म्हणाला पुष्कर जोग?

पुष्कर जोगने नुकताच एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यावेळी तो म्हणाला, आम्ही ज्या लोकांना फिल्मस विकतो तिकडे एकही मराठी माणूस नाही. मला आता ओटीटीची नावं नाही घ्यायची. आहोत ओटीटीमध्ये. एक बंगाली बाई आहे, एक माणूस आहे. त्या बाईला पुष्कर जोग नाही माहिती. ती माझी फिल्म कशी घेईल साधी गोष्ट आहे. आणि तसं ही आपला मराठी सिनेमा एखाद्या दुर्लक्षीत झालेल्या मुला सारखा झाला आहे. मला असं म्हणायचं होतं की हे सर्व एकमेकांशी संबंधीत आहे. आपण मत देणार, मंत्र्यांना बोलणार. मंत्री म्हणणार आम्ही काय करु? इतके लोकं येतायेत पुणे आणि मुंबईमध्ये पण विकास होतोय का? प्रत्येक पार्टी येते आणि तिच्या तिच्या पद्धतीने काम करते. ते तरी काय करणार? बाहेरुन जी माणसं येतात ती थांबयली पाहिजेत.

मराठी कलाकारांना कमी लेखता.

पुढे तो म्हणाला, आज मला सांगा बॉलिवूडचे पाच ते सहा कलाकार आहेत. मला नावं नाही घ्यायची. इथे येऊन कोट्यवधी रुपये कमावतात. एका-एका सिनेमाचा 10-15 कोटी रुपये घेतात. कुठून घेता? महाराष्ट्रातून घेता ना. निर्माता कुठे आहे महाराष्ट्रात आहे. 15 कोटी तुम्ही एका फिल्ममधून कमावता मग तुम्हाला या राज्यात मराठी शिकता येत नाही? 15-15 कोटी कमावता तुम्ही आणि मराठी शिकता येत नाही? लाजा नाही वाटत तुम्हाला? प्लस तुम्ही मराठी कलाकारांना कमी लेखता. आपण दादागिरी करायची आणि मराठीतच बोलायचं. मैं नही बोलूंगा मराठी जो करना है करो हे जिथे बोलतील ना तिथे गप्प नाही राहायचं. हे माझं राज्य आहे लोकांना हे का कळत नाही. आपल्याला इथे येऊन धडे शिकवलेले चालतील का? हे बोलल्यानंतर मला जे काही ट्रोल करतील करु दे. मला बोलण्याचा अधिकार आहे.

शेवटी पुष्कर जोग म्हणाला की, बॉलिवूड आणि मराठी सिनेमे दुर्दैवाने एकाच ठिकाणी मुंबईत आहेत. त्यामुळे आपल्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे थिएटर मिळत नाही हे नेहमीचं रडगाणं आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in