
महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेले ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक महत्त्वपूर्ण गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०१४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आला होता. डिसेंबर २०१४ मध्ये मित्रपक्षांकडून हा प्रस्ताव माझ्याकडे आला होता, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
तत्कालीन परिस्थितीत, काँग्रेस पक्षाची भूमिका शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नसल्याने, त्यांनी तो प्रस्ताव तात्काळ फेटाळला होता. आमच्या पक्षाला शिवसेनेसोबत जाणं मान्य होणार नाही असे म्हणत त्यांनी तो प्रस्ताव नाकारल्याचे सांगितले. मात्र, नंतर २०१९ मध्ये जेव्हा महाराष्ट्रात सत्तास्थापनेची समीकरणे जुळत नव्हती, तेव्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापनेचा प्रस्ताव आपण स्वतःच पुढे केला, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले आहे. या गौप्यस्फोटामुळे २०१४ आणि २०१९ मधील महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर नवा प्रकाशझोत पडला आहे. भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी हा प्रस्ताव पुढे आल्याचे त्यांनी सांगितले.
Leave a Reply