
अभिनेते प्रवीण तरडे यांचा ‘देऊळ बंद २’ अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाने १०० कोटींहून अधिक कमाई केली. जवळपास देशभरात या चित्रपटाने धुमाकूळ घातला. हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी सिनेमा ठरला आहे. नुकाताच अभिनेता कुशल बद्रिकेने प्रवीण तरडेंबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तो नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या…
‘देऊळ बंद २’च्या शूटिंगदरम्यान प्रवीण तरडे यांच्या शिस्तीच्या वागणुकीचे, तापटपणाचे आणि ओरडण्याचे अनेक किस्से ऐकायला मिळाले. या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःच कबूल केल्या आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत अभिनेता कुशल बद्रिकेने सांगितले की, प्रवीण तरडेने त्यांना सणसणीत कानाखाली मारली होती. हे सगळे चालू सीनदरम्यानच घडले असल्याचेही त्याने सांगितले आहे.
कुशल बद्रिकेचा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अंकुश चौधरी आणि अभिजीत चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रवीण तरडे देखील या चित्रपटात आहेत. प्रवीण तरडे आणि कुशल बद्रिके यांचे काही एकत्र सीन्स आहेत. एका सीनमध्ये प्रवीण तरडे कुशलला कानाखाली मारताना दिसत आहेत. मात्र हा सीन शूट करताना प्रवीण तरडे यांनी खरोखरच कुशलला कानाखाली मारली होती.
इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत कुशल बद्रिकेने हा किस्सा सांगितला. तो म्हणाला, “प्रवीण तरडेंनी टिचकी मारली तरी उडून जाईल असा माझा देह. त्याने मला सणसणीत कानाखाली मारलीये. हे सगळं विजू माने यांच्यामुळे झालं. ते आधी खूप सावरून-सावरून करत होते. पण प्रवीण म्हणाले की, ते रिअल वाटत नाही. त्या रिअलपणाच्या नादात प्रवीणने मला चांगलीच वाजवली.”
पुढे कुशलने प्रवीण तरडे यांची मिमिक्रीही केली. तो म्हणाला, “ए कुश्या, तू घाबरू नको. मी बरोबर करतो. हात बाजूने जाईल, असं ते म्हणाले. पण हात बाजूने गेलाच नाही, तो मला भाजून गेला.” सीन संपल्यानंतर कुशल बद्रिके दोन तास गालाला हात लावून बसला होता. तो म्हणाला, “प्रवीणने त्यानंतर सँडीलाही कानाखाली मारली. मी या सिनेमात खूप मार खाल्लाय यार!” ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा धम्माल कॉमेडी, अॅक्शन, सस्पेन्स आणि डॉनगिरीचा धमाका आहे. हा चित्रपट येत्या ३१ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.




Leave a Reply