• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Prajakta Mali: हाऊसफुलची गॅरंटी! प्राजक्ता माळी-ललित प्रभाकर पुन्हा एकत्र, यावेळी थेट डेस्टिनेशन वेडिंग

August 20, 2026 by admin Leave a Comment


मराठी मनोरंजनविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडी प्राजक्त माळी आणि ललित प्रभाकर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत आदित्य आणि मेघनाची भूमिका साकारून ही जोडी घराघरात पोहोचली होती. या जोडीला प्रेक्षकांनी दिलेलं भरभरून प्रेम लक्षात घेता, त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा चाहत्यांसाठी खास सरप्राइज ठरली आहे. विशेष म्हणजे तब्बल 13 वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. प्राजक्ता आणि ललित यांच्या या आगामी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. ‘आणि आम्ही परत एकत्र आलो..’ अशा शब्दांत या जोडीने चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे.

प्राजक्ता आणि ललितच्या या नव्या चित्रपटाचं नाव ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ असं आहे. नावावरूनच हा चित्रपट प्रेम, नातं आणि लग्नाभोवती फिरणारा असल्याचं स्पष्ट होतंय. मात्र यावेळी या जोडीच्या गाठी नेमक्या कुठे आणि कशा जुळणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओतही प्राजक्ता आणि ललितची भेट अगदी ‘जुळून येती रेशीमगाठी’मधल्या पहिल्या भेटीसारखीच आहे.

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Lalit Prabhakar (@lalit.prabhakar)

‘आणि आम्ही परत एकत्र आलो.. गेली 13 वर्षे हा महाराष्ट्र आमच्यावर भरभरून प्रेम करतोय. आपली ही रेशीमगाठ अजून घट्ट करायला आणि तुम्हाला परत प्रेमात पाडायला ही जोडी परत येतेय,’ असं कॅप्शन देत प्राजक्ता माळीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने ‘The OG Jodi is back’ अशी टॅगलाइनही दिली आहे. त्यामुळे प्राजक्ता आणि ललित यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पुन्हा अनुभवायला मिळणार असल्याने चाहत्यांचा उत्साह वाढला आहे.

या चित्रपटात साधं लग्न नसून थेट ‘डेस्टिनेशन वेडिंग’ पहायला मिळणार आहे. त्यामुळे लग्नसोहळा, प्रेमकहाणी आणि त्यातील धमाल असा मनोरंजनाचा तडका चित्रपटात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या जोडीच्या आधीच्या लोकप्रियतेचा विचार करता नव्या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा असणार आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 1 मे 2027 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in