• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Prajakta Mali: प्राजक्ता माळीने मुंबईत घेतलं तब्बल इतक्या कोटींचं आलिशान घर; 28 व्या मजल्यावर आहे फ्लॅट

August 18, 2026 by admin Leave a Comment

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुंबईत कोट्यवधी रुपयांचा आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. गोरेगाव पूर्व इथल्या 'ओबेरॉय एक्स्विझिट' या उच्चभ्रू प्रकल्पात प्राजक्ताने हा फ्लॅट घेतला आहे. या व्यवहारामुळे मनोरंजनविश्वासोबतच रिअल इस्टेट क्षेत्रातही तिच्या नव्या घराची चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्राजक्ताने 996 चौरस फुटांचा कार्पेट एरिया असलेला हा फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट 'ओबेरॉय एक्स्विझिट' या टॉवर 'सी'च्या 28 व्या मजल्यावर आहे. या घरासोबतच जवळपास 240 चौरस फुटांची टँडम कार पार्किंगची सुविधाही मिळाली आहे. हा व्यवहार 12 ऑगस्ट 2026 रोजी अधिकृतपणे नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्ताने 996 चौरस फुटांचा कार्पेट एरिया असलेला हा फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट 'ओबेरॉय एक्स्विझिट' या टॉवर 'सी'च्या 28 व्या मजल्यावर आहे. या घरासोबतच जवळपास 240 चौरस फुटांची टँडम कार पार्किंगची सुविधाही मिळाली आहे. हा व्यवहार 12 ऑगस्ट 2026 रोजी अधिकृतपणे नोंदवण्यात आला आहे.

या व्यवहारासाठी प्राजक्ताने 32.12 लाख रुपये स्टँप ड्युटी आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे घराच्या एकूण किमतीपैकी मोठा हिस्सा तिने गृहकर्जाच्या माध्यमातून उभारला आहे. कागदपत्रांवरील माहितीनुसार प्राजक्ताने इंडियन बँकेकडून 5.78 कोटी रुपयांचं गृहकर्ज घेण्यात आलं असून या कर्जाला 28 जुलै 2026 रोजी मंजुरी मिळाली होती.

या व्यवहारासाठी प्राजक्ताने 32.12 लाख रुपये स्टँप ड्युटी आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे घराच्या एकूण किमतीपैकी मोठा हिस्सा तिने गृहकर्जाच्या माध्यमातून उभारला आहे. कागदपत्रांवरील माहितीनुसार, प्राजक्ताने इंडियन बँकेकडून 5.78 कोटी रुपयांचं गृहकर्ज घेण्यात आलं असून या कर्जाला 28 जुलै 2026 रोजी मंजुरी मिळाली होती.

म्हणजेच घराच्या खरेदी किमतीपैकी जवळपास 90 टक्के रक्कम कर्जाच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे. प्राजक्ताने 6.42 कोटी रुपयांना हा फ्लॅट खरेदी केला आहे. 'ओबेरॉय एक्स्विझिट' हे मुंबईतील प्रीमिअम रेसिडेन्शियल प्रोजेक्ट म्हणून ओळखलं जातं. या परिसरात यापूर्वीही अनेक मोठ्या सेलिब्रिटींचे प्रॉपर्टीचे व्यवहार झाले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी 2025 मध्ये याच प्रोजेक्टमधील दोन फ्लॅट प्रत्येकी 6 कोटी रुपयांना विकले होते. तर रणवीर सिंहने 2023 मध्ये याच प्रकल्पातीन दोन अपार्टमेंट्स सुमारे 15.25 कोटी रुपयांना विकल्याची नोंद आहे. अभिनयासोबतच उद्योजिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राजक्ताने मुंबईत केलेली ही कोट्यवधींची गुंतवणूक तिच्या चाहत्यांसाठीही चर्चेचा विषय ठरत आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in