
Poonam Dhillon Hospitalised : नितळ हसू, बोलके डोळे आणि सौंदर्याने एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत गाजलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लो (Poonam Dhillon) यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपल्या प्रकृतीबाबत स्वतः पूनम यांनी माहिती दिली आहे. पूनम या रुग्णालयात दाखल होण्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली . मात्र त्यांना लवकर बरं वाटावं यासाठी अनेक चाहते प्रार्थना करत आहेत. दरम्यान, पूनम यांची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी यांनीदेखील त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाचे अपडेट दिले आहे.’ पूनम यांची प्रकृती आता स्थिर असून त्या वेगाने रिकव्हर होत आहेत. प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांना संध्याकाळपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. सध्या डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत’ अस पद्मिनी कोल्हापुर यांनी नमूद केलं.
CINTAAमधील वादामुळेही चर्चेत
खरंतर गेल्या काही काळापासून सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात CINTAAमधील नेतृत्वाच्या वादामुळेही पूनम धिल्लो या चर्चेत होत्या. CINTAAची अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मात्र CINTAA च्या जनरल सेक्रेटरी आणि अभिनेत्री उपासना सिंह यांनी पूनम धिल्लो आणि उपाध्यक्ष पद्मिनी कोल्हापुरी यांच्यावर मनमानी कारभार केल्याचा आरोप केला होता. या वादानंतर समितीतील 11 सदस्यांनी राजीनामा दिल्याचे समोर आलं होतं. त्यायमध्ये विंदू दारा सिंह, पुनीत इस्सर, मुकेश ऋषि, हेमंत पांडे, साहिल चड्ढा आणि दीपक पराशर यांच्या नावाच समावेश आहे. मात्र पूनम धिल्लो यांनी या वादावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अनेक शानदार चित्रपटात केलं काम
पूनम यांनी 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘त्रिशूल’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, संजीव कुमार आणि शशी कपूर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केलं. त्यानंतर त्या काला पत्थर, नूरी, दर्द, तेरी कसम, यादगार, लेला, कयामत, गिरफ्तार, तेरी महरबानियां, कर्मा नाम आणि मालामाल अशा अनेक चित्रपटांत झळकल्या.
Leave a Reply