• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PNG कनेक्शनसंबंधी सरकारचा मोठा निर्णय, LPG टंचाईतून असा मिळणार दिलासा…

June 4, 2026 by admin Leave a Comment


मध्यू पूर्वीतील तणाव आणि युद्धामुळे एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या दरम्यान आता केंद्र सरकार पाईप नॅचरल गॅसच्या जोडण्या वाढवण्याच्या दिशेने मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बातमीनुसार सरकारने एक राष्ट्रीय केंद्री कृत पोर्टल सुरु करण्याची योजना तयार करत आहे. ज्यामुळे लोकांना मोठा फायदा होणार आहे.

सध्या ग्राहकांना त्याच्या क्षेत्रात शहर गॅस वितरण कंपनी म्हणजे CGD कंपनी कडे वेगवेगळे अर्ज करुन पाईप गॅसची जोडणी मागावी लागते. प्रस्तावित पोर्टलद्वारे लोकांना एकाच प्लॅटफॉर्मवर अर्ज करता येणार आहे. यानंतर संबंधित गॅस कंपनीला निश्चित वेळेत या अर्जांचा विचार करुन गॅसची जोडणी देणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

गॅस पाईपलाईन मॅप ऑनलाईन होणार ?

केंद्र सरकार पीएनजी नेटवर्कला आणखी पारदर्शक बनवण्यासाठी गॅस ग्रिडच्या नकाशांना ऑनलाईन उपलब्ध करण्याचा देखील विचार करत आहे. यामुळे युजर्सना त्यांच्या घराच्या जवळ पीएनजी कनेक्शनची सुविधा उपलब्ध आहे की नाही ? याची माहीत तातडीने कळणार आहे. मात्र, पाईपलाईन संबंधी नकाशांना सार्वजनिक करण्यावर सुरक्षेचा धोक्या संदर्भातही चिंता व्यक्त केली जात आहे. यावर देखील चर्चा सुरु आहे.

सूत्राच्या मते या केंद्रीय पोर्टलद्वारे सरकार पाईप गॅस पुरवणाऱ्या CGD कंपन्यांच्या कार्यप्रणालीवर रिअर-टाईम निगरानी ठेवता येणार आहे. यामुळे लोकांची गॅस जोडणी मागणाऱ्या अर्जांचा किती दिवसात निपटारा केला जातो आणि कंपन्या दिलेल्या मुदतीत निर्णय घेतात की नाही याची देखील माहिती सरकारला झटपट मिळणार आहे.

LPG वरुन PNG मध्ये शिफ्ट करण्याची योजना

सरकारचे हे पाऊल खरेदी तर ग्राहकांना एलपीजी वरुन पीएनजीमध्ये शिफ्ट करण्याच्या धोरणाचे पाऊल आहे. भारत आपल्या एकूण एलपीजीच्या गरजेचा सुमारे ६० टक्के एलपीजी आयात करतो, त्यातील सुमारे ९० टक्के एलपीजी मध्य पूर्वेतील देशातून येत असतो.

आधीपासून हा नियम

मार्च २०२६ मध्ये सरकारने आदेश जारी केला होता की घरगुती युजर्न एक साथ LPG आणि PNG अशी दोन्ही कनेक्शन ठेवू शकणार नाहीत. ज्यांच्या घरात पीएनजी उपलब्ध आहे तेथे एलपीजीचा वापर करणाऱ्यांनी तीन महिन्यांच्या आत पीएनजीवर शिफ्ट होण्याचे आदेश दिले आहेत. आणि कोणी असे करत नसेल तर त्यांची एलपीजी कनेक्शन समाप्त केले जाणार आहे.

PNG कनेक्शनमध्ये वाढ

पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार मार्च २०२६ ते आतापर्यंत ८.६ लाख पीएनजी कनेक्शनमध्ये गॅस पुरवठा सुरु झाला आहे. सुमारे ३ लाख अतिरिक्त कनेक्शनसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले आहे. याच सोबत ८.८ लाख नवीन युजर्सने पीएनजी कनेक्शनसाठी रजिस्ट्रेशन केले आहे.तसेच ३१ मेपर्यंत सुमारे ७८ लाख युजर्सने एलपीजी कनेक्शन सरेंडर केले आहेत. कारण त्यांच्या क्षेत्राती पीएनजी गॅस जोडण्या मिळत आहेत.

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुमचा फ्रिज फक्त 5 मिनिटांत होईल चकाचक… ‘या’ टिप्स कळताच काम होईल सोपं…
  • …तर एकनाथ शिंदेंनाही ओमराजे निंबाळकर झटका देणार? म्हणाले, लोकसभेचं तिकीट नाही मिळालं तर थेट…
  • एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर, महागाई भत्त्यात मोठी वाढ, आता पगार थेट…
  • थलपती विजय यांचं विधानसभेत ‘सिनेस्टाइल’ भाषण; ‘ती’ कृती करताच टाळ्यांचा कडकडाट
  • जपमाळेत 108 मणीच का असतात, काय आहे संख्येचं महत्त्व?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in