• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PM Kisan: पीएम किसानच्या यादीत नाव, तरीही अडकू शकतो हप्ता, लागलीच करा हे तीन काम

September 6, 2026 by admin Leave a Comment


PM Kisan Yojana: शेतकरी सन्मान निधी योजनेचा 24 व्या हप्त्याची सध्या शेतकरी वाट पाहत आहेत. पण हा हप्ता अडकू शकतो. त्यासाठी हे तीन काम झटपट उरकून घ्या. लाभार्थी यादीत नाव असताना (Beneficiary List) काही त्रुटींमुळे खात्यात दोन हजार रुपये जमा होत नाहीत. जर तुमचे नाव यादीत असेल आणि तुम्हालाही हप्ता अडकण्याची भीती असेल तर अगोदर त्रुटी दूर करा. त्यासाठी ईकेयावसीची (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करून हप्ता मिळवू शकता.

कशी कराल e-KYC?

शेतकरी तीन प्रकारे पीएम किसान योजनेसाठी ईकेवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

OTP आधारे e-KYC (पीएम किसान पोर्टल आणि मोबाईल ॲपवर आधारीत)

बायोमॅट्रिक आधारे e-KYC (कॉमन सर्व्हिस सेंटर आणि राज्य सेवा केंद्रावरून करता येईल)

फेस ऑथेंटिकेशन आधारे e-KYC (पीएम किसान मोबाइल ॲपवर उपलब्ध )

OTP आधारे e-KYC अशी करा

पीएम किसान योजनेच्या अधिकृत साईटवर जा

e-KYC पर्यायावर क्लिक करा

या ठिकाणी तुमचा आधार कार्ड क्रमांक नोंदवा आणि मोबाईलवर आलेला OTP नोंदवा.

फेस ऑथेंटिकेशन आधारे e-KYC

Google Play Store मध्ये PM-Kisan Mobile App आणि Aadhaar Face RD App डाऊनलोड करा

आता ॲप उघडा आणि पीएम किसान नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून लॉगिन करा

Beneficiary Status या पेजवर जा.

याठिकाणी e-KYC ची स्थिती No दाखवत असेल तर e-KYC वर क्लिक करा

यानंतर तुमचा आधार क्रमांक नोंदवा, तुमचा चेहरा स्कॅन करा

चेहरा स्कॅन झाल्यावर तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण होईल

बँक खात्याला आधार कार्डशी लिंक करा

पीएम किसान योजनेची रक्कम Direct Benefit Transfer (DBT) द्वारे आधार खात्याशी संबंधित खात्यात जमा होते. जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल तर रक्कम खात्यात जमा होणार नाही. त्यासाठी बँक शाखेत जा. Aadhaar Seeding Form भरा. तुमचे खाते NPCI च्या खात्याशी लिंक करा. त्यानंतर पीएम किसान योजनेच्या साईटवर जाऊन Know Your Status मध्ये Aadhaar Bank Seeding Status तपासाल.

पीएम किसानसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

पीएम किसान योजनेत आता शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. या डिजिटल प्रणालीत प्रत्येक शेतकर्‍याला एक युनिक फार्मर आयडी दिला जातो. शेतीसंबंधीत योजना, पीक विमा आणि अनुदानाचा थेट लाभ मिळण्यासाठी ही नोंदणी बंधनकारक आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसीसोबतच ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Video : मुलींची छेड काढून, खाकी वर्दीशी हुज्जत, मग काय पोलिसांनी गटराजवळ लोळवलं, अधीच विसरणार नाही अशी दिली शिक्षा!
  • लोकांना वाईट वाटलं तर वाटू द्या, डीजे बंदी झालीच पाहिजे, शिंदेंच्या मंत्र्याची रोखठोक भूमिका!
  • तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज कारवाई; FDA च्या अधिकाऱ्यांनी नामांकित बेकरीला ठोकले टाळे
  • Weather Update : महाराष्ट्रात पाऊस धो-धो कोसळणार, या तारखा आजच नोट करून ठेवा, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज
  • थेट चिखलात उतरून हा अभिनेता करतोय शेती, 430 कोटींच्या संपतीचा आहे मालक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in