
रियान पराग याच्या नेतृत्वात अखेर राजस्थान रॉयल्स पंजाब किंग्सचा विजयरथ रोखण्यात यशस्वी ठरली आहे. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 39 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. तसेच राजस्थान यासह आयपीएल स्पर्धेत आपल्या तिसऱ्या सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करण्यात यशस्वी ठरली आहे. पंजाबने राजस्थानसमोर 223 धावांचं आव्हान ठेवलं होतं. राजस्थानने हे आव्हान 4 बॉलआधी आणि 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. राजस्थानने 19.2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 228 धावा केल्या. राजस्थानने अशाप्रकारे या मोसमातील एकूण सहावा विजय मिळवला. राजस्थानचा हा न्यू चंडीगडमधील पंजाब विरुद्धचा तिसरा विजय ठरला. तर पंजाबला या मोसमात 8 व्या सामन्यानंतर पहिल्या पराभवाची चव चाखावी लागली.
Leave a Reply