• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pankaja Munde: गोपीनाथ मुंडे खरंच काँग्रेसमध्ये जाणार होते? त्या दाव्यावर पंकजा मुंडेंचे सणसणीत प्रत्युत्तर, असा संपवला थेट विषय

August 15, 2026 by admin Leave a Comment


भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्यांना मंत्रिपद देण्याचीही चर्चा झाली होती, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यांनी याचा संदर्भही देण्याचा प्रयत्न केला. पण त्यावरून राज्यात वातावरण तापले. चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला. आता पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवामान बदल खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी या दाव्यावर मन मोकळे केले आहे. परळीत एका कार्यक्रमानिमित्त त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संयत प्रतिक्रिया दिली. त्यांनी पृथ्वीराज बाबांचा दावा खोडून काढला.

आता याविषयी बोलणे उचित नाही

पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर माध्यमांनी त्यांना प्रश्न केला. तेव्हा, “त्यांनी वक्तव्य केले होते. पण आता त्याचा काही अर्थ किंवा महत्त्वाचे उरलेले नाही. मुंडे साहेब आज आपल्यात हयात नाहीत. त्यामुळे आता त्यांच्याविषयी अशा चर्चा करणे औचित्यपूर्ण नाही. उपस्थित नसलेल्या व्यक्तीबद्दल मी बोलत नाही. मला जे माझे वडील समजले, ते या कमळातच जन्मले आणि कमळातच विसावले, हाच त्यांचा खरा राजकीय प्रवास आहे. आजच्या काळातही लोक आदराने त्यांचे नाव घेतात. पृथ्वीराज बाबांनीही आदरानेच त्यांचे नाव घेतले असेल.” अशी संयत प्रतिक्रिया मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

मी नाराज नाही, कष्टाने जगते

मीडिया कुठल्यातरी एका कार्यक्रमातला स्टेटमेंट घेऊन त्याचा विपर्यास करतो काही नाराज नाही. काही नाही, मस्त खातेपिते. माझ्यासाठी काम करण्यासाठी पूर्णपणे कष्टाने जगते. माझ्या बापाने आयुष्याचा शेवटचा श्वास समाजासाठी घेतला. त्यामुळे आधी राष्ट्र आहे मग पक्ष आहे. या संघटनेला मुंडे साहेबांनी वटवृक्ष बनवलं त्या मुंडे साहेबाला संघटनेने जे दिले. त्यांच्याविषयी असा विचार करण्याची आता गरज आहे असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

तुम्ही बूम लावला आणि विचारलं पंकजा मुंडे नाराज आहेत निराश आहेत. तुम्ही मला विचारलं का तुम्ही त्यांना विचारलं ते म्हणणारच ना त्यांना जे वाटतं ते म्हणाले त्यांनी त्याचे उत्तर दिले. त्यांनी माझा अनादर केला नाही. त्यामुळे मी कुणालाही दोष देत नाही. मी आणि असे खूप परिवार आहेत जे त्या संघटनेला बांधलेले आहेत. संघटनेचे काही वादळ येऊन काही त्रास हो चांगलं होव. चांगलं झाल्यावर माजत नाही त्रास झाल्यावर त्या पद्धतीचे आम्ही आहोत. मला कुणाला दोष द्यायचा नाही माझ्या बंजारा समाजाच्या वाक्याला तुम्ही बातमी बनवलं. अर्थाचे अनर्थ करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

महाविद्यालय जिल्ह्याचे नाही तर राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. जिल्ह्याचे नाव देशभरात जावं आंतरराष्ट्रीय पातळीवर जावं. अशा वस्तू उभ्या कराव्यात की शैक्षणिक दालनामध्ये देशभरातून आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांनी इथे यावं. असा आमचा प्रयत्न आहे, असा या कार्यक्रमाचा उद्देश पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in