‘ससुराल सिमर का’ या मालिकेत सिमरची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही काळापासून सतत विविध समस्यांचा सामना करतेय. आधी तिला लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर तिच्या पोटात सिस्ट आढळले. त्याचीही सर्जरी झाल्यानंतर दीपिका आता कुठे तिचं सर्वसामान्य आयुष्य जगत होती. इतक्यात तिचे सासरे आणि पती शोएब इब्राहिमचे वडील […]
ज्याची भीती होती तेच घडलं; रशियाने 90 मिसाईल डागल्या, 600 ड्रोनने भीषण हल्ला, आता युद्ध भडकणार
युक्रेनकडून दोन दिवसांपूर्वी रशियाच्या एका शहरामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये दहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तसेच त्या परिसरात रात्रभर हल्ले सुरूच होते. युक्रेनकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यांमध्ये रशियाचे 38 नागरिक देखील जखमी झाले होते. त्यानंतर रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे अधिक आक्रमक झाले होते. नागरी वस्तींवर आणि विद्यार्थ्यांच्या होस्टेलवर […]
नव्याकोऱ्या कारवर स्वास्तिक का काढले जाते? नेमकं लॉजिक समजताच वाटेल नवल!
हिंदू धर्मात स्वास्तिकाला खूप महत्त्व आहे. लग्न समारंभ, वास्तूशांती, गृहप्रवेश अशा वेगवेगळ्या शुभ कार्यक्रमात स्वास्तिक आवर्जुन काढतात. परंतु नव्या कारवर स्वास्तिक का काढतात? ते जाणून घेऊ या… भारतीय संस्कृतीत कोणतीही नवी वस्तू घरात आणण्याआधी त्या वस्तूची पूजा करणे शुभ मानले जाते. घरात नवी वस्तू आणण्याआधी देवाचे स्मरण केले जाते. ज्योतिषशास्त्रात वाहनाचा संबंध यात्रेशी जोडण्यात आलेला […]
पहिल्याच नजरेत प्रेमात पडाल… जगातील सर्वात रंगीबेरंगी पर्वताचे Photo व्हायरल
पेरूमधील प्रसिद्ध रेनबो माउंटन किंवा विनिकुंका हा पर्वत विविध रंगांनी नटलेला असून तो जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. दूरून पाहिल्यावर असे वाटते, जणू एखाद्या चित्रकाराने संपूर्ण पर्वतावर रंगांची उधळण केली आहे. त्यामुळेच या डोंगराला इंद्रधनुषी पर्वत असेही म्हटले जाते. हा सुंदर पर्वत दक्षिण अमेरिकेतील पेरू देशात आहे. अँडीज पर्वतरांगांमध्ये वसलेला हा डोंगर समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर असून, […]
IPL 2026: मुंबई इंडियन्सचा शेवटही पराभवाने, कर्णधार हार्दिक पांड्याने कारणमीमांसा करत सांगितलं की…
आयपीएल 2026 स्पर्धेतील 69वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला. पण हा सामना राजस्थान रॉयल्सने जिंकला. राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 8 गडी गमवून 205 धावा केल्या. तसेच विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही मुंबई इंडियन्सला गाठता आलं नाही. मुंबई इंडियन्स संघ […]
सोसाट्याचा वारा, तुफान वादळ, घराचे पत्रे कागदासारखे उडाले; या जिल्ह्यांना पावसाने झोडपलं
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातील मालेगावला आज अवकाळीचा तडाखा बसला. वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह आज जोरदार पाऊस कोसळला. दिवसभराच्या उकाड्यानंतर आलेल्या पावसामुळे शहरी भागात कमालीचा गारवा निर्माण झाला. मात्र या पावसामुळे ग्रामीण भागात शेतकरी वर्गाचे हाल झाले. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी शेतात […]