इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम भारतात बघायला मिळतोय. सतत पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत. सरकारने गेल्या 20 दिवसांच्या आत तब्बल चार वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली. होर्मुज खाडी बंद आहे. कच्च्या तेलाचा तुटवडा आहे. त्यामध्येच जागतिक बाजारात तेलाचे भाव वाढत आहेत. केंद्र सरकारने इराण अमेरिका युद्धात काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. यादरम्यानच […]
NIA ची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई; 23 वर्षीय तरुण ताब्यात, पाकिस्तानच्या दहशतवाद्याशी संपर्काचा संशय
देशभरात दहशतवादी कारवायांशी संबंधित संशयितांवर राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA नं मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत छत्रपती संभाजीनगरमधूनही एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. शेष नारायण असं या 23 वर्षीय तरुणाचं नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील बाराबंकी इथला रहिवासी आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून तो वाळूज एमआयडीसी परिसरात कामगार म्हणून काम करत […]
IPL 2026: अभिषेक शर्मावर विश्वास टाकणं धोक्याचं! सलग चार चुकांमुळे पोलखोल
आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचं आव्हान संपुष्टात आलं आहे. एलिमिनेटर फेरीत पराभव होताच स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. राजस्थान रॉयल्सने विजयासाठी 243 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हैदराबादचा संघ फक्त 196 धावा करू शकला. या पराभवानंतर अभिषेक शर्माच्या कामगिरीवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Photo: IPL/BCCI) अभिषेक शर्मा राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात खातंही खोलू शकला नाही. […]
धक्कादायक! गोल्ड मेडलिस्ट चिराग त्यागीची मित्रानेच गोळ्या झाडून केली हत्या, हॉस्टेलवरुन निघाला अन् रस्त्यात… नेमकं काय घडलं?
दिवसेंदिवस देशातील गुन्हेगारीचे सत्र वाढतच चालले आहे. गाझियाबादमधून एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय पॅरा-अॅथलीट चिराग त्यागीची थेट गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने देशभरात खळबळ माजली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या साई उपवन येथे त्याचा मृतदेह आढळून आला. तो सकाळी दिल्लीतील वसतिगृहातून (हॉस्टेल) मुरादनगरमधील बसंतपूर साथली या आपल्या गावी […]
सुपरहिट गाणं असणारा 56 वर्षे जुना चित्रपट, ज्याच्या शूटिंगवेळी राजेश खन्नावर चाहत्यांनी केली होती दगडफेक, बंद करण्यात आलेलं शूटिंग
Rajesh Khanna : हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना यांची लोकप्रियता आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. त्यांच्या अभिनयाची शैली, संवादफेक, चेहऱ्यावरील भाव आणि पडद्यावरील रोमँटिक अंदाज यामुळे लाखो प्रेक्षक त्यांचे चाहते बनले होते. विशेषतः महिला चाहत्यांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ होती. राजेश खन्नांची एक झलक पाहण्यासाठी लोक तासन्तास वाट पाहत असत. मात्र, त्यांच्या लोकप्रियतेमुळे […]
मोठी बातमी! भाच्यावर हल्ला होताच ममता बॅनर्जी संतापल्या, म्हणाल्या ‘शासक बनले मारेकरी…’
तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झालाल आहे. पक्षाच्या एका हत्या झालेल्या कार्यकर्त्याच्या घरी जात असताना अभिषेक बॅनर्जी यांना विरोधाचा सामना करावा लागला. भर रस्त्यात त्यांचे कपडे फाडले, त्यांच्या अंगावर अंडी फेकत हल्ला झाल्याचाही आरोप आहे. या हल्लाचा बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जी यांनी तीव्र निषेध केला आहे. […]