एकीकडे देशभरात नीट पेपरफुटीवरून वाद सुरू असताना दुसरीकडे शिक्षण व्यवस्थेवर आधारित एक वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर चर्चेत आली आहे. शिक्षण व्यवस्थेचं खरं रुप यात उघड करण्यात आलं आहे. अवघ्या पाच दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजने 'बर्लिन 2'सह इतर टॉप ट्रेंडिंगमधल्या सीरिजना मागे टाकलं आहे. नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेंडिंग यादीत पहिल्या क्रमाकांवर असलेल्या या वेब […]
Mamata Banerjee : रोजची कटिंग, आज अजून एक राजीनामा, आता उरले फक्त 10, ममता बॅनर्जींसोबत खेला होबे
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांना अजून एक झटका बसला आहे. गुरुवारी पक्षाचे राज्यसभा खासदार प्रकाश चिक बरेक यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. एका आठवड्यात राज्यसभेतील तिसऱ्या खासदाराने राजीनामा दिला आहे. कालच 10 जून रोजी बुधवारी सुष्मिता देव यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. राज्यसभेत तृणमुल काँग्रेसचे 13 खासदार होते. बरेक यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेत […]
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड, ४५ मिनिटे…
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खासगी विमानात बिघाड झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. हा बिघाड ९ जून रोजी मुंबईहून दिल्लीला जात असताना झाल्याचे समोर आले आहे. सुदैवाने, उड्डाणापूर्वीच हा बिघाड लक्षात आला. या बिघाडामुळे जवळपास ४५ मिनिटे उशिर झाल्याची माहिती समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या टीमकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या […]
ठाण्यात वृद्धाला बेदम मारल्याच्या घटनेनंतर मनसेच्या प्रमुख नेत्याची देवेंद्र फडणवीस यांना एकच कळकळीची विनंती की..
ठाण्यात एक वृद्ध व्यक्ती आणि ओला चालकाचा किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यानंतर ओला चालकाने वयाचा तसच कुठलाही पुढचा मागचा विचार न करता वृद्धाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या परप्रांतीय ओला चालकाला शोधून काढलं आणि शिवसेना स्टाईलने चोप दिला. स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष […]
अंकुश चौधरीच्या पत्नीचं मालिकेत जबरदस्त कमबॅक; साकारणार ही भूमिका
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दीपा परब तब्बल अडीच वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकाविश्वात पुनरागमन करत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीच्या आगामी ‘सुना येती घरा’ मालिकेत ती ‘उमावती’ ही अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. कुटुंबातील प्रत्येक नात्याला जपणारी, प्रसंगी स्वतःच्या भावना बाजूला ठेवून इतरांच्या आनंदाला प्राधान्य देणारी आणि घराला एकत्र ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करणारी उमावती ही व्यक्तिरेखा […]
केवळ गृहिणी नाही, त्या तर राष्ट्र निर्मात्या… महिलांच्या योगदानाची ‘सुप्रीम’ दखल.. तो निकाल वाचला का?
Supreme Court Verdict about Woman: गृहिणी, हाऊस वाईफ असं सांगताना काही महिला कचरतात. गृहिणींची कोणी दखल घेत नाही. स्त्री जन्म म्हणजे रांधा, वाढा आणि उष्टं काढा असं नाराजीचा सूरही उमटतो. पण सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात मोठी टिप्पणी केली आहे. त्यामुळे घराची जबाबदारी समर्थपणे निभावणाऱ्या महिलांना हायसे वाटेल. घरात सर्वांसाठी धावपळ करणाऱ्या देशातील लाखो महिलांसाठी कौतुकाची […]