महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळाल्या आहेत. अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. अलिकडेच शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आज महाविकास आघाडीकडून आमदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला 59 पैकी केवळ 35 आमदार उपस्थित होते. अशातच आता या बैठकीत उद्धव ठाकरे […]
Odi Ranking : आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा दबदबा, रोहित कितव्या स्थानी?
आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांचा वरचष्मा पाहायला मिळाला आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप 4 मध्ये कोण कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI) आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये न्यूझीलंडचा डॅरेल मिचेल पहिल्या स्थानी आहे. डॅरेलच्या नावावर एकूण 815 रेटिंग पॉइंट्स आहेत. (Photo Credit : PTI) भारतीय कर्णधार शुबमन गिल याने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. […]
Ketan Murder Case: अत्यंत धक्कादायक, धक्का देण्यापूर्वी सियाने केले ते क्रूर कृत्य… नाहीतर वाचला असता केतन? त्या जवळच्या व्यक्तीचा दावा काय?
Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलच्या चेहऱ्यावरून ती इतकी क्रूर असेल असे वाटत नाही. तिचा यापूर्वीचा कोणत्याही गुन्ह्यात सहभाग नाही अथवा ती कोणत्याही वेगळ्या प्रकरणात सहभागी असल्याचे समोर आलेले नाही. पण तिने ज्याप्रकारे केतन अग्रवाल याचा खून केला, त्याने पोलीस यंत्रणाही चक्रावली आहे. कोणत्याही प्रकारे आणि लवकरात लवकर तिला केतनचा काटा काढायचा होता. यासाठी तिने […]
इनफिनिक्स नोट 60 प्रो चा पिनिनफरिना एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
इन्फिनिक्स कंपनीने एप्रिलमध्ये त्यांचे नवीन डिव्हाइस इन्फिनिक्स नोट 60 प्रो सादर केले होते आणि या फोनचे कंपनी आता एक विशेष लिमिटेड एडिशन व्हेरिएंट भारतीय बाजारात सादर केले आहे. इन्फिनिक्स कंपनीने ग्राहकांसाठी इन्फिनिक्स नोट 60 प्रो पिनिनफरिना एडिशन लाँच केला आहे. या नवीनतम स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात तुम्हाला पहिल्यांदाच फोनमध्ये हेल्थ मॉनिटरिंग सेन्सर पाहायला मिळेल. […]
20 लाखांच्या गुंतवणुकीवर कुठे मिळेल सर्वाधिक परतावा? जाणून घ्या बेस्ट पर्याय
तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसह चांगला परतावा हवा असेल, तर बँक FD, सीनियर सिटीजन सेविंग्स स्कीम योजनेत सर्वाधिक व्याज आणि सुरक्षितता मिळते, याचे सविस्तर विश्लेषण करून तुमच्यासाठी योग्य पर्याय निवडा. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमचे पैसे गुंतवण्यासाठी सर्वोत्तम योजना शोधत असाल तर तुमच्याकडे बरेच पर्याय आहेत. यापैकी काही पर्याय म्हणजे बँक एफडी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना […]
Ketan Death Case : … तर केतनचा जीव वाचला असता, अभिनेत्री हिना खान सिया गोयलवर संतापली
टीव्ही अभिनेत्री हिना खान ही विविध सामाजिक आणि चर्चेतील विषयांवर आपली स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी ओळखली जाते. अलीकडेच पुण्यातील 26 वर्षीय केतन अग्रवालच्या मृत्यूचे प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. सुरुवातीला ही घटना ट्रेकिंगदरम्यान झालेला अपघात मानली जात होती. मात्र, तपास पुढे सरकल्यानंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. होणारी बायको सियाने आपला प्रियकर चेतनच्या मदतीने […]